Thursday, November 5, 2026
Google search engine
HomeUncategorized*दिवाळीनिमित्त ९ व ११ नोव्हेंबर रोजी एटीएस केंद्र मोशी येथे वाहन योग्यता...

*दिवाळीनिमित्त ९ व ११ नोव्हेंबर रोजी एटीएस केंद्र मोशी येथे वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची प्रक्रिया बंद*

 

 

पुणे दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) : दिवाळी सणानिमित्त दिनांक ९ व ११ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे एटीएस केंद्र, मोशी येथे या दिवशी वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची प्रक्रिया होणार नाही.

 

या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी पूर्वनियोजित वेळ (अपॉइंटमेंट) घेतलेल्या वाहनधारकांनी आपली वाहने दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी किंवा त्यानंतरच्या आठवड्यात एटीएस केंद्र, मोशी येथे तपासणीसाठी आणावीत.

 

संबंधित वाहनधारकांनी याची नोंद घेऊन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments