Thursday, November 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमआयटी डब्ल्यूपीयूत दिव्यांच्या रोषणाईत ‘दीपोत्सव’चा झगमगाट कर्मचाऱ्यांच्या कलाविष्काराने...

एमआयटी डब्ल्यूपीयूत दिव्यांच्या रोषणाईत ‘दीपोत्सव’चा झगमगाट कर्मचाऱ्यांच्या कलाविष्काराने भारावले प्रेक्षक; परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम

 

 

पुणे, दि. ५ नोव्हेंबर : दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशात, रांगोळीच्या रंगात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बहारात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा ‘दीपोत्सव २०२६’ गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या या दीपोत्सवाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शुभाशीर्वादाने आणि कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा संपन्न झाला.

 

कुलगुरू प्रा. डॉ. रविराज सीताराम, कुलसचिव डॉ. गणेश पोकळे, डॉ. दत्ता दंडगे, डॉ. मृदुला कुलकर्णी आणि कुणाल मराठे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

 

सायंकाळ होताच संपूर्ण डब्ल्यूपीयू परिसर आकर्षक रांगोळी आणि दीपमाळांनी उजळून निघाला. कर्मचाऱ्यांनी दीपावलीवर आधारित गाणी, नाटके, एकल नृत्य, समूह नृत्य, कविता आणि विनोद सादर करून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.

 

मुख्य आकर्षण ठरले स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे सादरीकरण

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या शिक्षकांनी सादर केलेले भारतीय नृत्यकलेचे सादरीकरण. परंपरा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तसेच विविध राज्यांतील संस्कृती, वेशभूषा, नृत्य आणि परंपरेचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले.

 

यावेळी बोलताना कुलगुरू प्रा. डॉ. रविराज सीताराम म्हणाले, “धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हे पाचही दिवस म्हणजेच खरी दीपावली. हा सण केवळ दिवे लावण्याचा नाही, तर मनातील अंधार दूर करण्याचा आहे.”

 

कुलसचिव डॉ. गणेश पोकळे म्हणाले, “शांतपणे तेवणाऱ्या दीपमालिकेच्या मंद प्रकाशातून साकार होणारा दीपोत्सव हे भारतीय संस्कृतीतील सुंदर स्वप्न आहे. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय म्हणजेच दिवाळी.”

 

दीपोत्सव हा केवळ एक उत्सव नसून, सर्व कर्मचाऱ्यांच्या स्नेहसंमेलनाचा आनंदसोहळा ठरला. कार्यक्रमाला सर्व विभागांचे डीन, डायरेक्टर, संचालक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments