Thursday, November 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedएचपी इंडियाचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्जनशीलतेला सहाय्य

एचपी इंडियाचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्जनशीलतेला सहाय्य

नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर २०२६— एचपी इंडियाने आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्जनशीलतेला सहाय्य करण्यासाठी डिझाइन केलेले एचपी ओम्निबुक ५ आणि भारतातील वाढत्या व्यवसायांच्या व मोबाइल व्यावसायिकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले एचपी प्रोबुक ४ जी२आयएच्या उद्घाटनाची घोषणा केली. कार्यक्षमता, सुवाह्यता आणि एआय-सज्ज अनुभवांवर लक्ष केंद्रित असलेली ही नवीन उपकरणे शिकण्याच्या आणि काम करण्याच्या अधिकाधिक लवचिक पद्धतींसाठी तयार करण्यात आली आहेत.

 

“भारतातील विद्यार्थी आणि व्यवसाय अधिक डिजिटल पद्धतीने जोडले जात असल्यामुळे तंत्रज्ञानाकडून त्यांच्या अपेक्षाही बदलत आहेत. विद्यार्थ्यांना अशा तंत्रज्ञानाची गरज आहे जे शिकण्याच्या तसेच सर्जनशीलतेच्या गतीशी जुळवून घेऊ शकेल, तर वाढत्या व्यवसायांना त्यांच्या विस्तारासोबत उत्पादकतेला आधार देऊ शकतील अशा विश्वासार्ह, सुरक्षित पीसींची आवश्यकता आहे. एचपी ओम्निबुक ५ आणि एचपी प्रोबुक ४ जी२आयएसच्या माध्यमातून आम्ही या भिन्न समुदायांसाठी त्यांच्या शिकण्याच्या, निर्मिती करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धतीनुसार डिझाइन केलेले उद्देशपूर्ण संगणकीय अनुभव घेऊन येत आहोत,” असे एचपी इंडियाचे पर्सनल सिस्टीम्स विभागाचे वरिष्ठ संचालक विनीत गेहानी म्हणाले.

 

एचपी ओम्निबुक ५: विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट अनुभव

एचपी ओम्निबुक ५ एआय-सज्ज कार्यक्षमता देतो. तो १६ टीओपीएस पर्यंतच्या एकात्मिक एनपीयू क्षमतेसह इंटेल® कोर™ ७ प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रकल्पांमध्ये उत्पादक राहू शकतात. प्रवासासाठी उपयुक्त असलेले हे उत्पादन ४२ तासांपर्यंतची लोकल व्हीपीबी (लोकल व्हिडिओ प्लेबॅक) बॅटरी लाईफ, ११.७७ मिमीची अतिशय सडपातळ रचना, १.१६ किलो वजनाचे हलके डिझाइन, एक लवचिक १८०° हिंज, दोन पूर्ण-कार्यक्षम यूएसबी-सी® पोर्ट्स आणि एचपीचा कॉम्पॅक्ट ६५ वॅट यूएसबी मिनी गॅन चार्जर देते. मनोरंजनाच्या एका तल्लीन करणाऱ्या अनुभवासाठी या लॅपटॉपमध्ये सिनेमॅटिक ओएलईडी डिस्प्ले, १००% डीसीआय-पी३ कलर कव्हरेज, एचपी आय ईझ टेक्नॉलॉजी आणि ९०% पर्यंत स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे. यामध्ये विंडोज हॅलो फेशियल रेकग्निशनसह एफएचडी आयआर कॅमेरा, ड्युअल मायक्रोफोन्स, पॉली स्टुडिओ-ट्यून ऑडिओ आणि डीटीएस:एक्स अल्ट्रा यांच्या माध्यमातून अखंड सहयोगाची सोय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्ग, व्हर्च्युअल मीटिंग्ज आणि दैनंदिन संभाषणांमध्ये जोडलेले राहण्यास आणि आत्मविश्वासाने सहभागी होण्यास मदत होते.

 

एचपी ओम्निबुक ५ विचारपूर्वक केलेल्या डिझाइनला वैयक्तिक अभिव्यक्तीसोबत जोडते आणि पहिल्यांदाच चार नवीन रंगांचे पर्याय सादर करत आहे: स्मोक सिल्व्हर, स्टारलिट ब्लू, पिओनी पिंक आणि सॉफ्ट हनीड्यू. प्रीमियम ॲल्युमिनियम चेसिस, टोन-ऑन-टोन कीबोर्ड आणि विशेष डिझाइन तपशिलांसह असलेला हा लॅपटॉप सौंदर्य आणि कार्यक्षमता यांचा मेळ घालतो. त्यामुळे ग्राहकांना त्यांची वैयक्तिक स्टाइल दाखवण्यासाठी अधिक पर्याय मिळतात.

 

 

 

HP OmniBook 5

 

 

एचपी प्रोबुक ४ जी२आयएस एआय पीसी: प्रीमियम डिझाइन, वाढत्या भारतीय व्यवसायांना चालना देण्यासाठी तयार

 

एचपी प्रोबुक जी२आयएस भारतातील वाढत्या व्यवसायांसाठी आणि मोबाईल व्यावसायिकांसाठी प्रीमियम डिझाइन, गतिशीलता आणि एआय-सज्ज कार्यक्षमता घेऊन येतो. एसएमबी (लघु आणि मध्यम व्यवसाय) आणि मोबाईल व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेले हे उपकरण, कार्यक्षमता आणि सुवाह्यतेसोबतच व्यवसायांना आवश्यक असलेली सहयोग आणि सुरक्षा वैशिष्ट्ये एकत्र आणते, कारण त्यांच्या टीम्स कार्यालये, घरे आणि ग्राहकांच्या ठिकाणी काम करतात.

 

एचपीचा सर्वात सडपातळ बिझनेस नोटबुक असलेल्या एचपी प्रोबुक जी२आयएसमध्ये आकर्षक १२ मिमि ॲल्युमिनियम डिझाइन आहे. त्याचे वजन फक्त १.१८ किलोपासून सुरू होते. मिस्ट सिल्व्हर, ॲटमॉस्फेरिक ब्लू आणि इक्लिप्स ग्रे या तीन वेगळ्या फिनिशमध्ये उपलब्ध, हे स्टाईलला १४ -इंचाच्या २.८ के ओएलईडी डिस्प्लेसोबत जोडते. त्यामुळे एक स्पष्ट आणि प्रवाही पाहण्याचा अनुभव मिळतो. हे डिव्हाइस इंटेल® कोअर™ ७ प्रोसेसर्स आणि १७ टॉप्सपर्यंतच्या एनपीयू परफॉर्मन्ससह येते, तसेच यात ३२जीबीपर्यंत मेमरी आणि १ टीबी स्टोरेज आहे. ते दैनंदिन उत्पादकता आणि उदयोन्मुख एआय-सक्षम वर्कफ्लोला पाठबळ देते.

 

व्यावसायिकांना कामासाठी कुठेही जावे लागले तरी त्यांना उत्पादक राहता येण्यासाठी बनवलेल्या एचपी प्रोबुक ४ मध्ये एचपी फास्ट चार्जसह ७० वॉट्स प्रति तास बॅटरी आणि एमआयएल- एसटीडी चाचणी केलेला टिकाऊपणा आहे. हायब्रीड कोलॅबोरेशनसाठी, एआयवर आधारित नॉईज रिडक्शन कॉल दरम्यान पार्श्वभूमीतील आवाज फिल्टर करते, तर एफएचडी एचडीआर+ आयआर कॅमेरा आणि ड्युअल मायक्रोफोन्स अधिक स्पष्ट व्हिडिओ आणि ऑडिओ अनुभव देण्यास मदत करतात. फिजिकल कॅमेरा प्रायव्हसी शटर, एचपी ड्राइव्ह लॉक आणि एचपी सिक्युअर इरेज यांसारखी व्यवसायकेंद्रित सुरक्षा वैशिष्ट्ये वापरकर्त्याची गोपनीयता आणि व्यावसायिक डेटाचे संरक्षण करण्यास मदत करतात.

 

 

HP ProBook 4 G2iS

 

 

किंमत आणि उपलब्धता

• एचपी ओम्नीबुक ५ १४ ची प्री-बुकिंग १० नोव्हेंबरपर्यंत एचपी ऑनलाइन स्टोअर आणि एचपी वर्ल्ड स्टोअरवर रु. १०९,९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत करता येईल. ग्राहक एचपी ऑनलाइन स्टोअर, एचपी वर्ल्ड स्टोअर आणि एचपी अधिकृत पुनर्विक्रेत्यांमार्फत लागू असलेल्या परवडणाऱ्या ऑफर्ससह हा लॅपटॉप रु. ७९,९९९ च्या प्रभावी किमतीत खरेदी करू शकतात.

 

• एचपी ओम्नीबुक ५ १४ येत्या १० नोव्हेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.

 

• एचपी प्रोबुक ४ जी२आयएस१४ ची किंमत ८६,००० + टॅक्स पासून सुरू होते आणि तो ६ नोव्हेंबर म्हणजे धनत्रयोदशीपासून मिस्ट सिल्व्हर रंगात उपलब्ध होईल. निवडक मिस्ट सिल्व्हर कॉन्फिगरेशन्स आता एचपी ऑनलाइन स्टोअरवर ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध आहेत, तर अॅटमॉस्फेरिक ब्लू आणि इक्लिप्स ग्रे व्हेरिएंट्स डिसेंबर २०२६ च्या अखेरपर्यंत उपलब्ध होतील.

 

एचपीबाबत

एचपी आयएनसी. (एनवायएसई: एचपीक्यू) ही एक जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी आहे आणि अशी सोल्यूशन्स तयार करते जी लोकांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यास आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टींशी जोडण्यास सक्षम करतात. १७० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत असलेली एचपी, पर्सनल कॉम्प्युटिंग, प्रिंटिंग, ३डी प्रिंटिंग, हायब्रीड वर्क, गेमिंग आणि इतर अनेक गोष्टींसाठी नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ उपकरणे, सेवा आणि सबस्क्रिप्शन्सची विस्तृत श्रेणी आणते. अधिक माहितीसाठी, कृपया

http://www.hp.com ला भेट द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments