Friday, November 6, 2026
Google search engine
HomeUncategorized*MH61K मालिकेतील पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ७ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सुविधा*

*MH61K मालिकेतील पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ७ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सुविधा*

 

 

 

पुणे, दि. ६ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नव्याने सुरू होणाऱ्या MH61K या वाहन नोंदणी मालिकेतील आकर्षक व पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्यासाठी ऑनलाइन फेसलेस सुविधा ७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे.

 

 

नागरिकांना https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर आधार लिंक मोबाईल क्रमांक किंवा ओटीपीच्या माध्यमातून नोंदणी करून पसंतीचा उपलब्ध क्रमांक ऑनलाइन शुल्क भरून आरक्षित करता येईल. या प्रक्रियेसाठी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी ऑफलाइन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही.

 

 

अर्जदारांनी संकेतस्थळावर नवीन नोंदणी करून लॉगिन करावे, उपलब्ध क्रमांकाची निवड करून ऑनलाइन शुल्क भरावे आणि पावतीची प्रत संबंधित वाहन विक्रेत्याकडे सादर करावी. वैयक्तिक मालकीच्या वाहनांव्यतिरिक्त कंपनी, फर्म आदींच्या नावावरील वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक कार्यालयामार्फत जारी करण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments