Friday, November 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedफॉर्म्युला 1 चे भारतात पुनरागमन; F1® सिम रेसिंग इंडिया ओपनचा पहिला राष्ट्रीय...

फॉर्म्युला 1 चे भारतात पुनरागमन; F1® सिम रेसिंग इंडिया ओपनचा पहिला राष्ट्रीय विजेता घोषित

 

मुंबईच्या 10 वर्षीय विहान जोशीने पटकावले पहिले राष्ट्रीय विजेतेपद; NSCI डोम येथे पार पडलेल्या स्पर्धेत अगस्त्य इव्हान क्रास्टो आणि हृदान संध्या यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले.

मुंबई, 6 नोव्हेंबर: F1® सिम रेसिंग इंडिया ओपन 2026 च्या माध्यमातून फॉर्म्युला 1 ने भारतात पुनरागमन केले. मुंबईतील NSCI डोम येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अंतिम फेरीत मुंबईच्या 10 वर्षीय विहान जोशीने 15 वर्षांखालील (Under-15) गटाचे विजेतेपद पटकावले. मुंबईच्याच अगस्त्य क्रास्टोने दुसरे, तर पुण्याच्या हृदान संध्या याने तिसरे स्थान मिळवत या कनिष्ठ गटातील विजेतेपदाच्या व्यासपीठावर स्थान मिळवले.

मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेड (MFRL) आणि फॉर्म्युला 1 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या इंडिया ओपन स्पर्धेत देशभरातील पात्रता फेऱ्यांनंतर भारतातील काही प्रतिभावान युवा सिम रेसिंगपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. 15 वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय अंतिम फेरीत निवड झालेल्या 20 स्पर्धकांनी सध्याच्या F1 रेसिंग कॅलेंडरमधील विविध ट्रॅकवर स्पर्धा केली. त्यामध्ये पुढील ट्रॅकचा समावेश होता:

अल्बर्ट पार्क सर्किट (ऑस्ट्रेलिया)

बहरीन इंटरनॅशनल सर्किट (बहरीन)

सर्किट गिल व्हिलेन्यूव्ह (कॅनडा)

सर्किट डी बार्सिलोना-कॅटालुनिया (स्पेन)

ऑटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिग्ज (मेक्सिको)

यास मरीना सर्किट (यूएई)

 

मुंबईतील पोदार ORT इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या विहानने पात्रता फेऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केली. अंतिम फेरीतही त्याने आपला फॉर्म कायम राखत सहापैकी पाच शर्यती जिंकल्या आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.

15 वर्षांखालील गटातील ही स्पर्धा MFRL च्या व्यापक ‘वन इन अ बिलियन’ (One in a Billion) उपक्रमाचा एक भाग आहे. भारतातील उदयोन्मुख रेसिंग प्रतिभा शोधणे आणि त्यांना योग्य प्रशिक्षण व संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या युवा रेसिंगपटूंना MFRL च्या कार्टिंग कार्यक्रमात प्रवेशाची संधी मिळणार आहे. यामुळे सिम रेसिंगपासून प्रत्यक्ष मोटरस्पोर्ट्सपर्यंत पोहोचण्याचा मार्ग युवा खेळाडूंसाठी खुला होणार आहे.

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील ओपन गटाचा अंतिम निकालही आज जाहीर होणार असून, वरिष्ठ गटाच्या विजेतेपदासाठी निवड झालेले 20 स्पर्धक एकमेकांशी स्पर्धा करतील. या गटातील अव्वल दोन स्पर्धकांना 7 ते 9 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ‘कप ऑफ नेशन्स’ (Cup of Nations) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या आंतरराष्ट्रीय सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत जगभरातील सिम रेसिंगपटू सहभागी होणार असून, भारताला जागतिक सिम रेसिंगमधील आघाडीच्या संघांशी स्पर्धा करण्याची संधी मिळेल.

भारतीय मोटरस्पोर्ट्ससाठी शाश्वत प्रतिभा विकास व्यवस्था उभारण्याच्या MFRL च्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांमधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आगामी दशकात भारताला पुढील फॉर्म्युला 1 ड्रायव्हर घडवता यावा, हे या उपक्रमाचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.

F1 सिम रेसिंग इंडिया ओपन 2026 : अव्वल 10 स्पर्धक (15 वर्षांखालील गट)

विहान जोशी – 134 गुण

अगस्त्य इव्हान क्रास्टो – 108 गुण

हृदान संध्या – 76 गुण

युवान अहिराव – 75 गुण

आरव गुप्ता – 67 गुण

रियांश शर्मा – 64 गुण

कैवान इराणी – 34 गुण

देव बांब – 24 गुण

जुजहार सिंग जोहर – 12 गुण

अथर्व हेमानी – 12 गुण

 

 

 

मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडविषयी

मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेड (MFRL) ही भारतातील महत्त्वाकांक्षी उच्च-कार्यक्षमता क्रीडा संस्थांपैकी एक आहे. प्रतिभा विकास, स्पर्धा आणि जागतिक स्तरावरील क्रीडा उत्कृष्टतेसाठी जागतिक दर्जाची व्यवस्था निर्माण करण्यावर संस्थेचा भर आहे. 2019 मध्ये स्थापन झालेल्या MFRL ने भारतीय मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात एक अग्रगण्य संस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. भारतीय युवा खेळाडूंना सर्वोच्च स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे, यासाठी त्यांच्यासाठी नियोजनबद्ध संधी आणि मार्ग उपलब्ध करून देण्याचे संस्थेचे ध्येय आहे. MFRL सध्या फॉर्म्युला रिजनल मिडल ईस्ट ट्रॉफीमधील सांघिक आणि ड्रायव्हर्स अजिंक्यपद तसेच UAE4 सिरीजमधील ड्रायव्हर्स अजिंक्यपदाची मानकरी आहे.

FIA मान्यताप्राप्त सिंगल-सीटर अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय संघ म्हणून मुंबई फाल्कन्सने विशेष ओळख मिळवली आहे. 2022 च्या फॉर्म्युला रिजनल एशियन चॅम्पियनशिपमध्ये संघाने ड्रायव्हर्स आणि टीम्स ही दोन्ही विजेतेपदे पटकावली होती. याशिवाय, संघाने फॉर्म्युला रिजनल मिडल ईस्ट चॅम्पियनशिप आणि F4 मिडल ईस्ट चॅम्पियनशिप यांसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर भारतातील तळागाळातील मोटरस्पोर्ट्सला प्रोत्साहन देणे आणि सिम रेसिंगच्या माध्यमातून प्रतिभावान खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे यावरही संस्थेचा भर आहे.

मोटरस्पोर्ट्सच्या पलीकडे जाऊन MFRL आपला विस्तार व्यापक उच्च-कार्यक्षमता क्रीडा क्षेत्रात करत आहे. T20 मुंबई लीगमधील सोबो मुंबई फाल्कन्स (SoBo Mumbai Falcons) या संघाच्या मालकीद्वारे संस्थेने क्रिकेट क्षेत्रातही प्रवेश केला आहे. प्रत्येक क्रीडा उपक्रमात मुंबई फाल्कन्स डेटा, शिस्त, नावीन्य आणि खेळाडू-केंद्रित विकास यांचा समन्वय साधत भारतातील चॅम्पियन्सची पुढील

पिढी घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments