Monday, November 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedपाटील व मुश्रीफ यांनी एकत्र बसन्याच्या सल्ल्या पेक्षा, महायुती संचालकांना कोरम'पुर्तीचा सल्ला...

पाटील व मुश्रीफ यांनी एकत्र बसन्याच्या सल्ल्या पेक्षा, महायुती संचालकांना कोरम’पुर्तीचा सल्ला फडणवीसांनी द्यावा.. !* *- तीच खरी संविधानीक कर्तव्य पुर्तता होईल..!!*

 

राज्यसरकार ला गोकुळ मध्ये हस्तक्षेपास रस नसल्याचे फडणवीसांच्या वक्तव्याचे स्वागत आहे, मात्र नियुक्ती आदेश (जीआर) फडणवीसांनी मागे घ्यावा..!!

*- काँग्रेस*

** प्रदेश काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी*

 

पुणे दि.  ८ नोव्हें – :

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार गोकुळ मध्ये हस्तक्षेप करू ईच्छीत नसल्याचे विधान केले.. हे दुध उत्पादक शेतकऱ्यांचा रोष पहाता.. उशीरा सुचलेले शहाणपण असून,

फडणवीस सरकार जर खरोखर हस्तक्षेप करू ईच्छीत नसेल तर.. गोकुळ’ च्या सभासदांनी दिलेला कौल मान्य करून, महायुतीच्या सदस्यांना सांगून कोरम पूर्ततेचा सल्ला द्यावा नव्हे ‘तर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र बसण्याचा सल्ला देऊ नये..

अन्यथा सतेज उर्फ बंटी पाटील यांचे नेतृत्वाखालील संविधानीक संचालकांच्या मागे काँग्रेस पक्ष मजबूत उभा राहील.!!

राज्यसरकार ला गोकुळ मध्ये हस्तक्षेपास रस नसल्याचे फडणवीसांच्या वक्तव्याचे स्वागत आहे मात्र राज्यपाल मंजूर नियुक्ती आदेश (जीआर) फडणवीसांनी त्वरित मागे घ्यावा असे आवाहन वजा सल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना

दिला आहे.

गोकुळ दूध संघाच्या प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या निवडणुकीत माजी मंत्री व विधान परिषद काँग्रेस पक्षाचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल बहुमताने विजयी झाले. महाविकास आघाडीच्या 13 सदस्यांच्या मागे आता केवळ कोल्हापूर जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला आहे.

 

गोकुळच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप करण्याऐवजी भाजपने विरोधी पक्षाच्या भूमिकेतून संस्थेच्या कामकाजावर लक्ष ठेवावे तेच खरे संविधानीक कर्तव्यपुर्ती ठरेल.

सभासदांनी निवडणुकीद्वारे निवडून दिलेल्या संचालक मंडळाचा कौल स्वीकारणे ही लोकशाहीची प्राथमिक जबाबदारी आहे. निवडणुकीतून यश मिळाले नाही म्हणून ‘सरकारी नियुक्त्यांनी सरकारी संचालकांच्या माध्यमातून’ संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करणे लोकशाही मुल्यांचा गळा घोटणे आहे असे ही गोपाळ

दादा तिवारी यांनी स्पष्ट केले.

 

लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या कामकाजात अडथळे निर्माण करण्याऐवजी संस्थेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करावे व प्रसंगी जागरूक व सतर्क विरोधी पक्षाची संविधानीक भुमिका निभावणे गरजेचे आहे.. असे आवाहनही त्यांनी केले.

 

——————///—————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments