Thursday, November 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्स आणि टर्नो यांनी इलेक्ट्रिक स्मॉल कमर्शियल वेईकल्स आणि पिकअप्सची मालकी...

टाटा मोटर्स आणि टर्नो यांनी इलेक्ट्रिक स्मॉल कमर्शियल वेईकल्स आणि पिकअप्सची मालकी सुलभ करण्यासाठी सहयोग केला

मुंबई, ११ नोव्हेंबर २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्मॉल कमर्शियल वेईकल्स आणि पिकअप्स (ई-एससीव्हीपीयू) ग्राहकांसाठी सानुकूलित फायनान्सिंग योजना उपलब्ध करून देण्याकरिता भारतातील पहिली बॅटरी इंटेलिजन्स आणि लाइफसायकल व्यवस्थापन कंपनी फिंझो ईव्ही सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड (टर्नो) सोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या सहयोगांतर्गत, टाटा मोटर्सच्या ग्राहकांना जलद कर्ज वितरण, लवचिक परतफेडीच्या योजना आणि २५ टक्‍के अॅश्युअर्ड बायबॅक गॅरंटीचा लाभ मिळेल.

 

या प्रसंगी मत व्यक्त करत टर्नोचे डायरेक्टर श्री. वरुण नायर म्हणाले, “टर्नोमध्ये आमचे ध्येय ईव्ही मालकीचा प्रवास अधिक सोपा आणि फायदेशीर बनवून संपूर्ण भारतात हरित, शून्य-उत्सर्जन गतिशीलतेकडे होणाऱ्या संक्रमणाला गती देणे हे आहे. इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहतुकीला वेग येत असताना ग्राहकांना त्यांच्या वाहनाच्या जीवनचक्रादरम्यान त्याच्या मूल्याबाबत अधिक स्पष्टता आणि खात्री असणे आवश्यक आहे. टाटा मोटर्ससोबत आमचा सहयोग सानुकूलित फायनान्सिंग आणि अॅश्युअर्ड बायबॅक सहाय्य एकत्र आणून या गरजा पूर्ण करतो, ज्यामुळे इलेक्ट्रिक वेईकल्सकडे वळणे अधिक सुलभ होते. बॅटरी इंटेलिजन्स आणि ईव्ही लाइफसायकल व्यवस्थापनातील आमचा अनुभव, तसेच अॅश्युअर्ड बायबॅक प्रोग्रामसह आम्ही इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्सची मालकी आणि पुनर्विक्रीच्या प्रवासाबाबत अधिक विश्वास निर्माण करत आहोत.”

 

या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स लिमिटेडच्या एससीव्हीपीयू विभागाचे व्हाईस प्रेसिडंट आणि बिझनेस हेड श्री. पिनाकी हल्दर म्हणाले, “टाटा मोटर्स स्वच्छ गतिशीलतेचे लोकशाहीकरण करण्यासाठी आणि भारतातील शाश्वत लास्ट-माईल लॉजिस्टिक्समधील संक्रमणाला गती देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमची ई-एससीव्हीपीयू श्रेणी उत्कृष्ट कामगिरी, विश्वासार्हता आणि किफायतशीर ऑपरेटिंग खर्च देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, तरीही वाहनाची मालकी सुलभ, अंदाजित आणि चिंतामुक्त बनते, तेव्हाच प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. टर्नोसोबत आमचा सहयोग ग्राहकांना संपूर्ण मालकी सहाय्य देऊन आमच्या ईव्ही परिसंस्थेला अधिक दृढ करतो. फायनान्सिंगमधील अडथळे दूर करून आणि दीर्घकालीन पुनर्विक्री मूल्य सुरक्षित करून आम्ही देशभरातील ग्राहकांना अधिक आत्मविश्वासाने शून्य-उत्सर्जन गतिशीलतेकडे वळण्यासाठी सक्षम करत आहोत.”

 

टाटा मोटर्स आपल्या विस्तृत ई-एससीव्हीपीयू श्रेणीसह भारतातील इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल संक्रमणाचे नेतृत्व करत आहे. यामध्ये विविध मालवाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक लोड डेक कॉन्फिगरेशन आणि पेलोड पर्यायांसह उपलब्ध असलेल्या एस प्रो ईव्ही, एस ईव्ही १००० आणि इंट्रा ईव्ही पिकअप यांचा समावेश आहे. या वेईकल्सना सर्वसमावेशक परिसंस्थेचे पाठबळ लाभले आहे, ज्यामध्ये १५० पेक्षा जास्त शहरांमधील २५,००० हून अधिक सार्वजनिक चार्जर्स, वाहनांचा अविरत वापर (हाय अपटाइम) सुनिश्चित करण्यासाठी देशभरातील २०० हून अधिक समर्पित ईव्ही सपोर्ट सेंटर्स, संपूर्ण सेवा २.० अंतर्गत सर्वसमावेशक लाइफसायकल केअर, टाटा मोटर्सचे कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्म फ्लीट एजच्या माध्यमातून फ्लीट व्यवस्थापन, तसेच आघाडीच्या बँका, एनबीएफसी आणि मोबिलिटी फायनान्सर्ससोबत धोरणात्मक सहयोगांचा समावेश आ

हे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments