Thursday, November 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रामदैवत श्री कसबा गणपतीला अन्नकोटाचा महानैवेद्य* दीपावली पाडव्यानिमित्त मंदिरात भरतनाट्यम चे...

ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला अन्नकोटाचा महानैवेद्य* दीपावली पाडव्यानिमित्त मंदिरात भरतनाट्यम चे सादरीकरण

 

 

पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने दीपावली पाडव्यानिमित्त अन्नकोटाचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गाभाऱ्यासह मंदिरात केलेली आकर्षक सजावट आणि अन्नकोट पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

 

अन्नकोटामध्ये गोवर्धन पर्वत सजावटीसह चिवडा, चकली, काजू,बदाम पिस्ते,अनारसे, कडबोळी, शंकर पाळी, केळी, खव्याच्या पोळ्या असे मिष्टान्न मांडण्यात आले होते. मंदिरात दीपावली निमित्त दररोज सकाळी व सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

पाडव्या निमित्त अन्नकोट आणि भरतनाट्यम कार्यक्रम देखील पार पडला. तसेच सकाळी दिवाळी पहाटनिमित्त सुगम संगीताचा कार्यक्रम होता. कार्यक्रमांचे आयोजन देवस्थानचे खजिनदार व सांप्रत पुजारी हेरंब ठकार आणि अश्विनी हेरंब ठकार यांनी केले. यावेळी मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments