सायकल स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते, पदपथ, सायकल ट्रॅक व सुशोभीकरणाची कामे निर्धारित कालमर्यादेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश
पुणे : आगामी पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने पुणे शहरातील चारही पॅकेजअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकास, डांबरीकरण, पदपथ, सायकल ट्रॅक व सुशोभीकरणाच्या कामांचा आढावा आज मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम व मा. जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी संयुक्तपणे घेतला.
यावेळी स्पर्धेच्या मार्गावर विविध युटिलिटी कामांसाठी खोदाईची परवानगी देऊनही विहित मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या MNGL, MSEDCL, दिनेश इंजिनिअरिंग, Allied Digital व इतर संबंधित संस्थांच्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित संस्थांनी दिनांक २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सर्व प्रकारची खोदाईची कामे पूर्ण करावीत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत नवीन खोदाईस परवानगी देण्यात येणार नाही. त्यानंतरही खोदाई केल्याचे आढळल्यास प्रचलित दराच्या किमान चारपट दराने शुल्क आकारणी करण्याबाबत धोरणात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
बैठकीतील प्रमुख निर्णय व निर्देश
१. रस्ते खोदाईसाठी २० नोव्हेंबर अंतिम मुदत
* MNGL, MSEDCL, दिनेश इंजिनिअरिंग, Allied Digital व इतर संबंधित संस्थांनी २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सर्व मंजूर खोदाईची कामे पूर्ण करावीत.
* 31 ऑक्टोबर 2026 नंतर नवीन खोदाईच्या परवानग्या देण्यात येणार नाहीत.
* मुदतीनंतर खोदाई केल्यास प्रचलित दराच्या किमान चारपट शुल्क आकारणी करण्याचे धोरण लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
* संबंधित संस्थांनी बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार किती काम पूर्ण करणार, किती मनुष्यबळ व किती टीम तैनात करणार याचा स्पष्ट उल्लेख असलेले लेखी हमीपत्र (Undertaking) सादर करावे.
* खोदाईनंतर रस्ते व पदपथांची तातडीने आणि दर्जेदार पुनर्स्थापना होण्यासाठी महापालिकेच्या नियुक्त कंत्राटदारांच्या माध्यमातून कामे करून घेण्याबाबत कार्यवाही करावी.
२. सायकल स्पर्धेच्या चारही पॅकेजच्या कामांना गती
* चारही पॅकेजच्या कामांचा निर्धारित Milestones नुसार नियमित आढावा घेण्यात आला.
* संबंधित कंत्राटदारांनी डांबरीकरण, पदपथ, कर्बस्टोन, काँक्रीट दुरुस्ती व इतर कामांसाठी अतिरिक्त टीम व मनुष्यबळ तातडीने वाढवावे.
* पुढील आढावा बैठकीपर्यंत बहुतांश पॅकेजमध्ये किमान ३६ टक्क्यांपेक्षा अधिक प्रगती साधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
* अंतिम टप्प्यातील पॅकेजमध्ये किमान ३० टक्के प्रगती साधण्याचे निर्देश देण्यात आले.
* केवळ रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करणे म्हणजे काम पूर्ण झाले असे समजले जाणार नाही. पदपथ, कर्बस्टोन, रोड मार्किंग व इतर अनुषंगिक कामांसह संपूर्ण स्ट्रेच पूर्ण करणे आवश्यक राहील.
३. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई
* निर्धारित Milestone नुसार कामांची पूर्तता न करणाऱ्या कंत्राटदारांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी.
* अपेक्षित प्रगती साध्य न झाल्यास निविदेतील अटी व शर्तींनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
* पुढील आढावा बैठकीत समाधानकारक सुधारणा दिसून न आल्यास संबंधित कंत्राट रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
* आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.
४. पदपथ व पादचारी सुविधांचा विकास
* सायकल स्पर्धेच्या मार्गावरील पदपथ सलग, सुरक्षित व पादचाऱ्यांसाठी सुलभ असावेत.
* पदपथांसाठी अतिरिक्त टीम तैनात करून कामांचा वेग वाढवावा.
५. अतिक्रमण निर्मूलन व परिसर व्यवस्थापन
* सायकल स्पर्धेच्या संपूर्ण मार्गावरील अनधिकृत अतिक्रमणे, फेरीवाले व इतर अडथळे वॉर्ड ऑफिसर, झोनल उपायुक्त आणि उपायुक्त,अतिक्रमण पोलिस यांनी संयुक्त पणे कारवाई क तातडीने दूर करावेत.
*
६. रस्ते व परिसराचे सौंदर्यीकरण (Urban Beautification & Placemaking)
* सायकल स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते, चौक, रोड आयलंड, भिंती, पदपथ सार्वजनिक जागांचे आकर्षक सुशोभीकरण करावे.
* प्रमुख ठिकाणी भित्तिचित्रे, शिल्पे, हरित पट्टे, बैठक व्यवस्था व इतर सार्वजनिक सुविधा विकसित कराव्यात.
७. खासगी विकसक व प्रायोजकांच्या सहभागातून विकासकामे
* सायकल स्पर्धेच्या मार्गावरील निवडक रस्ते, चौक, सार्वजनिक जागा व परिसराचे सौंदर्यीकरण खासगी विकसकांकडून त्यांच्या स्वखर्चाने करून घेण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, चारही पॅकेजच्या कंत्राटदारांचे अभियंते, MSEDCL व MNGL चे अधिकारी, दिनेश इंजिनिअरिंग व Allied Digital चे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहरातील रस्ते, पदपथ, सायकल ट्रॅक, सार्वजनिक सुविधा व परिसराचे सौंदर्यीकरण दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून पुणे शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक आकर्षक व आधुनिक स्वरूप देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी देण्यात आले.


