पुणे : सामाजिक विषमता, अज्ञान आणि अन्यायाच्या अंधकारातून समाजाला बाहेर काढण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण, समता आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार समाजासमोर मांडला. वंचित आणि शोषित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविणाऱ्या त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाला दिशा देत आहे. महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण आणि विचारांचा जागर करण्यासाठी माळी समाज संघ पुणे शहराच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आमदार हेमंत रासने, माजी आमदार कमल ढोले पाटील, माजी आमदार दिप्ती चवधरी, महात्मा फुले वसतीगृहाचे मुख्य विश्वस्त अरुणभाऊ कुदळे, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद सातव, नगरसेविका रूपाली धाडवे, भिडे वाडा-फुले वाडा स्मारक समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे, ज्येष्ठ पत्रकार संजय नवले, माळी समाज संघ पुणे शहराचे अध्यक्ष दिपक जगताप, माळी समाज संघ पुणे शहराच्या महिला अध्यक्ष स्मिता लडकत, बाळासाहेब लडकत, गिरीष झगडे, यशोधन आखाडे, रिमा लडकत, सोमनाथ बटवाल, सिमा घोड, राजेंद्र लडकत, सारंग राऊत, रूपाली लडकत, मंगेश जवाहिरे, कुंडलिक गायकवाड, वैशाली रासकर, अशोक कुदळे, बंडू कचरे, वंदना बनकर, गणेश वाडकर, अलका लडकत, दुर्गेश नवले, विठ्ठलजाय म्हेत्रे, हनुमंत टिळेकर, पांडुरंग गाडेकर, शांता नेवसे, वनितानांगरे, विजय कोठावळे, मनिषा पांढरे, जयश्री हतागळे, धनंजय झुरुंगे, अजय टिळेकर, संदिप चौरे, भारतीताई झगडे, शाशिकला ढोले पाटिल, प्रतिभा झगडे, आकाश दहिवडे, प्रवीण धाडगे, कैलास काठे, शारदा फरांदे, अनंता रासकर, प्रिती लोखंडे, आशा कुदळे, रवी सहाने, आरती सहाने आदी उपस्थित होते.
हेमंत रासने म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण आणि सामाजिक समतेसाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. समाजातील वंचित घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. महात्मा फुले यांचे कार्य आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे.


