पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ २०२५-२०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुण्याचा नंबर घसरला. मागील वेळेला आठवा नंबर होता यावेळी बारावा झाला आहे. अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी व्यक्त केली आहे. आपल्या सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की
प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोग घरी करा स्वतःच्या पैशाने जनतेच्या नाही…
चार अधिकारी आणि चार राजकीय नेते एकत्र येऊन वाटेल ते करतायेत त्यामुळे पुण्याची वाट लागते आहे…
एकाच कॉन्ट्रॅक्टरला ओला सुका कचरा
एक कॉन्ट्रॅक्टर आगीमध्ये मनपाची मशिनरी भस्मसात करतो त्याला पायघड्या…
एका कॉन्ट्रॅक्टरचा विषय दप्तरी दाखल झाला तरी बोलवून बेकायदेशीरपणे काम देण्याचा घाट…
शौचालय साफ करण्यासाठी 85 रुपयाच्या खाली तुम्ही पैसे घ्यायचेच नाहीत हा आग्रह…..
रस्ते झाडणकाम करण्यासाठी अकुशल कामगार पुरवणे यासाठी अनावश्यक अटी….
सगळं कॉन्ट्रॅक्टरच्या हिता साठी चालू आहे पुणेकरांचे हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत आणि स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुण्याचा नंबर 12 वा जातो आहे हे दुर्दैव आहे
जबाबदारी स्वीकारून अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांचा चार्ज काढून घ्या..
वाटेल ते चालू आहे….
पुण्याची वाट लावण्याचे काम घनकचरा विभाग आणि त्याचे सर्व संबंधित प्रमुख अधिकारी करीत आहेत….
पुणे महानगरपालिकेचे ५००० कायमस्वरूपी कर्मचारी जे वर्षानुवर्ष साफसफाईचे काम करतात त्यांना घरी बसवले आणि कॉन्ट्रॅक्टर्सचे घर भरले…
याचे हे परिणाम आहेत
पुण्याशी कोणाला काही घेणं देणं उरलेलं नाही
मला काय त्याचे….
एक प्रवृत्ती वाढती आहे
पुण्याला कोणी वाली नाही
पुण्याला नेता नाही हे पुण्याचे दुर्दैव आहे
हे शहर माझ आहे हे मानणारा कार्यकर्ता उरलेला नाही
कचरा व्यवस्थापन, झाडण कामातील नवनवीन प्रयोग आणि प्रक्रियेवर दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च करूनही पुण्याची स्वच्छतेतील घसरण थांबलेली नाही
याला जबाबदार कोण
मागील वर्षी टेंडर काढून बाहेरील ठेकेदाराला झाडण काम देऊन साडेचार हजार कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करत होते या कामाचा परिणाम म्हणून नंबर घसरला व पहिल्या पेक्षा पुणे अस्वच्छ झाले आणि आता ज्या कामगारांमुळे पुण्यालाआठवा नंबर मिळाला होता त्या महानगरपालिकेतील ५००० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना काम न देता ९००० ठेकेदाराची माणसे घेऊन पुणे स्वच्छ करण्याचा घाट घातला आहे यात पुणे स्वच्छ होणार नाही तर पुणेकरांचे खिसे रिकामे होऊन निर्णय घेणाऱ्यांचे खिसे मात्र भरले जाणार आहेत असे आमचे मत आहे त्यामुळे पुणे मनपाचे कायमस्वरूपी कर्मचारी व जिथे कमी कर्मचारी आहेत तेवढेच त्या त्या ठिकाणी ठेकेदाराचे कर्मचारी घेऊन यांच्यावरच काम करावे पुणेकरांचे १३ कोटी रुपये वाचवावेत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना काम न देता 25 कोटी पगार घ्यायचा व साडेचार हजार नवीन जागी कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी घेऊन 13 कोटी रुपये दरमहा खर्च करायचे ते वाचवावेत व फक्त नवीन ठिकाणी कमी पडतील तेवढेच कर्मचारी कॉन्ट्रॅक्टरचे घ्यावेत तसेच पुणे शहर स्वच्छ होते आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी आपल्या खात्याचे डीएसआय, एसआय व मुकादम यांच्यावर पूर्णपणे द्यावी जी आत्ता पूर्ण शहराची जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेतली आहे हे खूप चुकीचे आहे आपले घर आपणच साफ करायचे असते पाहुण्याला बोलवुन घर कधी साफ होत नाही तर घरातला माल मात्र साफ होतो
कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर सप्लायर……
अरे बापरे त्यांचच राज्य दिसते…….
कुणाला वेळ नाही…..
पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळ नाही…..
आस्था नाही…….
दिसतंय ते टाक खिशात…
हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत…
डोळे उघडले पाहिजे….
मोठा इशारा आहे….
नागरिकांनी देखील जागरूक राहिल पाहिजे असे आमचे मत आहे…..
जनजागृती जनजागरण मोहीम आम्ही सुरू करणार आहोत….
पुण्याचा स्वच्छतेचा नंबर खाली गेला हे दुर्दैव असलं तरीही या दुर्दैवामध्ये आपण सगळ्यांनी मिळून संधी शोधून या शहराला पुन्हा एकदा एक नंबर वर नेल पाहिजे हाच संकल्प……
या प्रतिक्रिया त्यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधींना पाठविल्या आहेत.


