Sunday, November 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिवंगत श्रीपाद ढेकणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोथरूडमध्ये अभ्यासिका* *ना....

दिवंगत श्रीपाद ढेकणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोथरूडमध्ये अभ्यासिका* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार*

 

 

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूड मध्ये अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. दिवंगत सहकारी श्रीपाद ढेकणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबविण्यात येत असून, या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्याचा प्रयत्न आहे.

 

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक सुविधा मिळणे महत्त्वाचे असते. ही गरज लक्षात घेऊन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा एक अद्ययावत सोईसुविधांनीयुक्त अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प होता.

 

त्यानुसार, कोथरुड मधील कर्वेनगर भागात ही अभ्यासिका सुरु करण्यात आली असून, सर्वप्रकारच्या सोईसुविधांनी युक्त असे आणि अतिशय माफक शूल्क आकरण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 

“स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे, त्यांच्या संघर्षाला योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्या यशाच्या प्रवासात हातभार लागावा, हीच या उपक्रमामागची भावना आहे. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी आधारवड ठरेल आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग सुकर करेल, असा विश्वास आहे,” असे मत यावेळी ना. पाटील यांनी व्यक्त केले.

 

दरम्यान, एका सहकाऱ्याच्या स्मृतींना सामाजिक उपक्रमातून जिवंत ठेवत विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा हा उपक्रम श्रीपाद ढेकणे यांना समर्पित भावपूर्ण आदरांजली ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments