Sunday, November 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गौरव राव...

कोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गौरव राव याला विजेतेपद 

 

 

नांदेड, 15 नोव्हेंबर 2026: नांदेड डिस्ट्रिक्ट आणि सिटी शहर लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या कोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 30 वर्षांवरील पुरुष गटात गौरव राव याने विजेतेपद संपादन केले.

 

एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 30 वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित गौरव राव याने अव्वल मानांकित मोहित सोरडेचा 6-1, 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 30 वर्षांवरील महिला गटात उपांत्य फेरीत रेखा होळंबे हिने कल्पना खानापुरेवर 6-0, 6-1 असा सहज विजय मिळवला.

 

40 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत बिगर मानांकित गणेश देवखिळेने अव्वल मानांकित राम कुमार चौधरीचा 6-2, 7-5 असा सनसनाटी पराभव केला. दुसऱ्या मानांकित जयनारायण केआर याने लक्ष्मीनिवास कलंत्रीला 6-1, 6-2 असे नमविले. 45 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित स्वरणदीप सिंग धोडीने नीलेश चांडकचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली.

 

निकाल: 30 वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी:

गौरव राव(भारत)[2] वि.वि. मोहित सोरडे(भारत)[1]6-1, 6-2;

 

30 वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:

रेखा होळंबे (भारत)वि.वि.कल्पना खानापुरे(भारत) 6-0, 6-1;

तृप्ती होळंबे(भारत)पुढे चाल वि. सपना शहा(भारत)[1]

 

35 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:

शशांक बोमनाळे(भारत)वि.वि.विनीत तेहरा(भारत) 6-4, 6-2;

 

40 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:

गणेश देवखिळे(भारत)वि.वि.राम कुमार चौधरी(भारत)[1] 6-2, 7-5;

जयनारायण केआर(भारत)[2]वि.वि.लक्ष्मीनिवास कलंत्री(भारत)6-1, 6-2;

 

45 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:

स्वरणदीप सिंग धोडी(भारत)[1] वि.वि.नीलेश चांडक(भारत)6-3, 6-2;

पराग अत्रे(भारत)पुढे चाल वि.अरिं

दम देब(भारत) [2]

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments