Monday, November 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारत इतिहास संशोधन मंडळाच्या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या डिजिटायझेशनचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते...

भारत इतिहास संशोधन मंडळाच्या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या डिजिटायझेशनचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण*

 

 

पुणे, दि. १६ – भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे लोकार्पण आज केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज येथे केले. यावेळी व्यासपीठावर मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुरकुंबी इतिहास उपक्रमाचे नरेंद्र मुरकुंबी, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, सचिव पांडुरंग बलकवडे उपस्थित होते. कोषाध्यक्ष नंदकुमार निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर बलकवडे यांनी आभार मानले.

भारत इतिहास संशोधक मंडळ गेल्या ११६ वर्षांपासून इतिहास संशोधनाचे काम करीत आहे. मंडळाकडे असलेल्या कागदपत्रांमुळे मराठ्यांच्या इतिहासाची जगाला माहिती देण्याच्या उद्देशाने या प्रकल्प राबवण्यात आला आहे. मराठा इतिहासाचा कालखंड उजेडात आणण्याचे काम मंडळाने केले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत २०२१ मध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता, त्याच्या पहिल्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. www.bismarchives.in या वेबसाइटवरून ही दुर्मिळ कागदपत्रे तसेच अमूल्य वस्तूंची सचित्र माहिती घेता येणार आहे. या डिजिटायझेशन प्रकल्पाचे काम चिन्मय भांडारी आणि मिथिलेश कुळकुर्णी यांच्या न्यानसा कंपनीने माईंडस्केप हबच्या साहाय्याने केले आहे. मंडळाकडील सुमारे ३ लाख कागदपत्रांच्या साडेसहा पृष्ठे (इमेजेस) लवकरच उपलब्ध होणार आहेत, त्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे १० हजार कागदपत्रे वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहेत. यामध्ये बखरी, मुघल फर्माने, हस्तलिखिते तसेच ताम्रपट, चित्रे, नकाशे, शिल्पे, शस्त्रे, शिलालेख, भूमिपत्रे, दुर्मिळ ग्रंथ याचा समावेश आहे. भारतीय इतिहासाचे जागतिक स्तरावर या दुर्मिळ माहितीचे प्रसारण होत असल्याचे यावेळी रावत यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी मुरकुंबी इतिहास उपक्रम आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांची मोलाची मदत झाली आहे.

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments