Wednesday, November 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedडेक्कन जिमखाना अ‍ॅक्वाटिक्स होम गाला वॉटरपोलो व जलतरण स्पर्धेत २५० हून अधिक...

डेक्कन जिमखाना अ‍ॅक्वाटिक्स होम गाला वॉटरपोलो व जलतरण स्पर्धेत २५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

 

पुणे, १८ नोव्हेंबर २०२६: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आणि पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात आलेल्या डेक्कन जिमखाना अ‍ॅक्वाटिक्स होम गाला वॉटरपोलो व जलतरण स्पर्धेत २५० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ही चार दिवसीय स्पर्धा १९ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत डेक्कन जिमखाना येथील टिळक जलतरण तलावावर रंगणार आहे.

 

स्पर्धेचे संचालक शौर्य करंदीकर यांनी स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, “अ‍ॅक्वाटिक्स होम गाला हा युवा जलतरणपटू आणि वॉटरपोलो खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी तसेच स्पर्धात्मक अनुभव मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला उपक्रम आहे. विविध वयोगटांतील २५० हून अधिक खेळाडू सहभागी होत असल्याने चार दिवस रंगतदार सामने आणि चुरशीच्या स्पर्धा पाहायला मिळतील. जलक्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे, खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती जोपासणे आणि त्यांना भविष्यातील स्पर्धांसाठी तयार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.”

 

वॉटरपोलो स्पर्धेत डीजी यलो शार्क्स, डीजी ग्रीन टायटन्स, डीजी पर्पल लिजेंड्स आणि डीजी रेड वॉरियर्स हे चार संघ सहभागी होणार आहेत. साखळी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघ इतर सर्व संघांविरुद्ध खेळणार आहे. साखळी फेरीअखेर गुणतालिकेत सर्वाधिक गुण मिळवणारा संघ विजेता ठरणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

तसेच, जलतरण स्पर्धा ५ वर्षांखालील ते १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वयोगटांत खेळविण्यात येणार आहे. यामध्ये ५० व १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, ५० व १०० मीटर बॅकस्ट्रोक, ५० व १०० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर फ्रीस्टाइल, ४०० मीटर वैयक्तिक मिडले, ८०० मीटर फ्रीस्टाइल आणि १५०० मीटर फ्रीस्टाइल या प्रकारांचा समावेश आहे. या जलतरण स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना चषक व पदके देऊन गौरविण्यात येणा

र आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments