Thursday, November 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रयेजा सिटी अंडरपासच्या कामामुळे वाहतुकीत बदल*

प्रयेजा सिटी अंडरपासच्या कामामुळे वाहतुकीत बदल*

 

 

पुणे, दि. १९ (जिमाका वृत्तसेवा): मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील प्रयेजा सिटी व्हेईकल अंडरपासचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दि. १९ नोव्हेंबर २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

 

त्यानुसार, सनसिटीकडून प्रयेजा सिटीकडे जाणारी वाहतूक सेंट हेलरियस स्कूलमार्गे सनसिटीकडे वळविण्यात आली आहे. तसेच प्रयेजा सिटीकडून शरद हॉस्पिटलच्या दिशेने जाणारी वाहतूक मधुकोश सोसायटीमार्गे वळविण्यात आली आहे.

 

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments