पुण्यात चौथे ‘सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी शो २०२६’ आणि ‘सीआयआय सरफेस कोटिंग शो २०२६’चे उद्घाटन
पुणे, १९ नोव्हेंबर २०२६ : स्वदेशी नवोन्मेष, तंत्रज्ञानातील प्रगती, शाश्वत उत्पादन प्रक्रिया आणि उद्योग क्षेत्रातील अधिक दृढ सहकार्याच्या बळावर पुढील पिढीतील मोबिलिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात भारत जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्यास सज्ज आहे, असे मत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. पुण्यातील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आज चौथ्या ‘सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी शो २०२६’ आणि ‘सीआयआय सरफेस कोटिंग शो २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उद्घाटनप्रसंगी सीआयआय पश्चिम विभाग २०२६-२७ चे अध्यक्ष आणि ब्लू स्टार लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीर एस. अडवाणी, सीआयआय पश्चिम विभाग सरफेस कोटिंग शो २०२६ आयोजन समितीचे अध्यक्ष आणि आयआयटी मुंबईच्या मेटलर्जिकल इंजिनिअरिंग अँड मटेरियल्स सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. स्मृतिरंजन परिदा, सिद्धार्थ ऑटोमॅट इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक सुरेंदर यादव, प्रिझम सरफेस कोटिंग्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रीतम कुमार गणेशन, टेकएक्सपर्ट इंजिनिअरिंग प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जे. व्ही. इंगळे तसेच सीआयआय पश्चिम विभाग फ्युचर मोबिलिटी समितीचे सह-अध्यक्ष आणि आरएसबी ट्रान्समिशन्स (इंडिया) लिमिटेडचे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहेरा उपस्थित होते.
हे दोन्ही प्रदर्शन १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. या प्रदर्शनांमध्ये उद्योग क्षेत्रातील दिग्गज, उत्पादक आणि तंत्रज्ञान पुरवठादार सहभागी होऊन इलेक्ट्रिक मोबिलिटी, ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान, प्रगत कोटिंग्स, सरफेस इंजिनिअरिंग आणि इंटेलिजंट मॅन्युफॅक्चरिंगमधील नव्या संकल्पना व तंत्रज्ञान सादर करण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनांसोबत आयोजित शिखर परिषदांमध्ये स्थानिकीकरण, पुरवठा साखळीची सक्षम उभारणी, डिजिटल परिवर्तन आणि शाश्वत उत्पादन प्रक्रिया या विषयांवर चर्चा होणार आहे.
सीआयआय पश्चिम विभाग २०२६-२७ चे अध्यक्ष आणि ब्लू स्टार लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीर एस. अडवाणी म्हणाले, “जागतिक मोबिलिटी क्षेत्रातील परिवर्तनात केवळ सहभागी होण्याऐवजी त्याला दिशा देण्याची आणि उत्पादन, नवोन्मेष व तंत्रज्ञान विकासासाठी भारताला जागतिक स्तरावरील पसंतीचे केंद्र बनविण्याची मोठी संधी आपल्यासमोर आहे. या क्षेत्रातील पुढील टप्प्यातील प्रगतीसाठी तंत्रज्ञानातील प्रगती, संशोधन आणि विकासातील गुंतवणूक, स्वदेशी क्षमता आणि मूल्यनिर्मिती यांना प्राधान्य द्यावे लागेल. मोठे उत्पादक, एमएसएमई, तंत्रज्ञान पुरवठादार आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य अधिक दृढ करून एकात्मिक आणि सक्षम उत्पादन परिसंस्था उभारणे आवश्यक आहे. उत्पादन क्षेत्राच्या विकासात शाश्वततेलाही महत्त्वाचे स्थान द्यावे लागेल.”
सीआयआय पश्चिम विभाग सरफेस कोटिंग शो २०२६ आयोजन समितीचे अध्यक्ष आणि आयआयटी मुंबईच्या मेटलर्जिकल इंजिनिअरिंग अँड मटेरियल्स सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. स्मृतिरंजन परिदा म्हणाले, “सरफेस इंजिनिअरिंग ही केवळ उत्पादनाच्या अंतिम टप्प्यातील प्रक्रिया राहिलेली नसून पुढील पिढीतील मोबिलिटीसाठी महत्त्वाची तंत्रज्ञानविषयक क्षमता बनली आहे. वाहनांचा टिकाऊपणा, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि शाश्वतता यामध्ये सरफेस कोटींगची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. इलेक्ट्रिक वाहने, हलक्या वजनाचे साहित्य आणि प्रगत बॅटरी प्रणाली यांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे नाविन्यपूर्ण कोटिंग आणि सरफेस ट्रीटमेंट सोल्यूशन्सचे महत्त्व वाढत आहे. अशा प्रदर्शनांमुळे उद्योग, संशोधक आणि तंत्रज्ञान पुरवठादारांना नवकल्पना सादर करण्याची, सहकार्याच्या संधी शोधण्याची आणि भारताचे जागतिक उत्पादन व मोबिलिटी क्षेत्रातील स्थान अधिक बळकट करण्याची संधी मिळते.”
सिद्धार्थ ऑटोमॅट इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक सुरेंदर यादव म्हणाले, “वाढती उत्पादन क्षमता, कुशल अभियांत्रिकी मनुष्यबळ आणि विस्तारत असलेली देशांतर्गत बाजारपेठ यामुळे भारताला जागतिक मोबिलिटी क्षेत्रात आघाडी घेण्याची अनोखी संधी आहे. वाहन उद्योगाचे भविष्य वेग, उत्पादनाचा विस्तार आणि शाश्वतता यांचा समतोल साधत सक्षम व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक पुरवठा साखळी उभारण्यावर अवलंबून असेल. नवोन्मेषाला गती देण्यासाठी आणि पर्यावरणपूरक विकासासाठी उत्पादक, पुरवठादार, तंत्रज्ञान पुरवठादार आणि संशोधन संस्थांमधील सहकार्य महत्त्वाचे ठरेल.”
प्रिझम सरफेस कोटिंग्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रीतम कुमार गणेशन म्हणाले, “उदयोन्मुख मोबिलिटी तंत्रज्ञान केवळ स्वीकारण्यापुरते मर्यादित न राहता नवोन्मेष आणि अभियांत्रिकी क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याची भारताकडे मोठी संधी आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील विविध घटकांमध्ये अधिक सहकार्य निर्माण झाल्यास या परिवर्तनाला गती मिळेल आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उपाय विकसित करता येतील. सर्वात कमी किमतीत उत्पादन देण्याऐवजी नवोन्मेष, गुणवत्ता आणि उत्पादनाच्या संपूर्ण जीवनचक्रातील खर्चावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.”
टेकएक्सपर्ट इंजिनिअरिंग प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जे. व्ही. इंगळे म्हणाले, “भारतीय वाहन उद्योगाच्या पुढील टप्प्यातील विकासाला स्वदेशी अभियांत्रिकी क्षमता, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सातत्यपूर्ण नवोन्मेष यांची चालना मिळेल, असा माझा विश्वास आहे. ओईएम, टियर १ आणि टियर २ पुरवठादार तसेच एमएसएमई यांच्यातील सहकार्य वाढवून प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि गुणवत्तावाढीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सीआयआय नेक्स्टजेन मोबिलिटी शो आणि सरफेस कोटिंग शो यांसारखी प्रदर्शने नव्या संकल्पना मांडण्यासाठी, तंत्रज्ञान सादर करण्यासाठी आणि भागीदारीच्या संधी निर्माण करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतात.”
सीआयआय पश्चिम विभाग फ्युचर मोबिलिटी समितीचे सह-अध्यक्ष आणि आरएसबी ट्रान्समिशन्स (इंडिया) लिमिटेडचे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहेरा म्हणाले की, भारतीय वाहन उद्योगाचे भविष्य हे नवोन्मेषाचा वेग, उत्पादन क्षमता आणि शाश्वतता यावर अवलंबून असेल. तंत्रज्ञानाचा स्वीकार वेगाने करण्यासाठी, देशांतर्गत पुरवठा साखळी अधिक सक्षम करण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील भारताची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी ओईएम, पुरवठादार, संशोधन संस्था आणि एमएसएमई यांच्यात अधिक सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


