Thursday, November 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedतीन तिगाडा, तरुण प्रेम, भव्य स्वप्नं आणि अनपेक्षित वळणांची हृदयस्पर्शी कथा, आता...

तीन तिगाडा, तरुण प्रेम, भव्य स्वप्नं आणि अनपेक्षित वळणांची हृदयस्पर्शी कथा, आता स्ट्रीमिंग हिंदी Zee 5वर

 

~ प्रसन्ना बिष्त आणि दानेश रझवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा तरुणाईच्या प्रेमभावना उलगडणारा रोमँटिक ड्रामा, कॉलेजमधील प्रेमकथेची नवीन अनुभव देणारी कलाकृती आहे. प्रत्येकाने आवर्जून पाहावा असाच हा सुंदर तरुणाईचा रोमँटिक प्रवास! ~

 

राष्ट्रीय, 20 नोव्हेंबर 2026: प्रेम, स्वप्नं आणि जीवन क्वचितच योजनेनुसार चालते. तारुण्यातील प्रणय, महत्त्वाकांक्षा आणि अनपेक्षित वळणे यांना एकत्र आणणारा ‘तीन तिगाडा’ आता हिंदी Zee 5 वर स्ट्रीम होत आहे. संगीत आणि क्रिकेटच्या जगावर आधारित, हे आगामी नाट्य दोन तरुण व्यक्तींचे प्रेम आणि त्यांच्या आकांक्षांवर आधारित आहे. जे केवळ त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी कल्पना केलेल्या प्रत्येक गोष्टीला आव्हान देणाऱ्या जीवन बदलणाऱ्या परिस्थितीचा सामना करताना दिसतात. प्रसन्ना बिष्त, दानेश रजवी, अर्चना अरोरा, समर्थ मेहता आणि ग्रुशा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘तीन तिगाडा’ची निर्मिती स्ट्रीटलॅम्प मीडिया एंटरटेनमेंट एलएलपी आणि आय स्क्रीम ड्रीम्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे.

 

या मालिकेच्या केंद्रस्थानी आहेत प्रसन्ना बिष्त हिने साकारलेली आस्मानी आणि दानेश रझवी याने साकारलेला मनन. आपापल्या नात्याला आणि वैयक्तिक स्वप्नांना सांभाळत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित गर्भधारणेमुळे मोठे वळण येते. त्यांच्या प्रेमकथेची दिशा पूर्णपणे बदलून जाते आणि दोघांनाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते.

 

एकीकडे स्वप्ने, दुसरीकडे प्रेमसंबंध आणि अचानक येऊन ठेपलेल्या नव्या जबाबदाऱ्या… या सगळ्यांमध्ये अडकलेल्या या तरुण जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार? आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण त्यांच्या भविष्याला कोणते नवे वळण देणार? असे अनेक प्रश्न या कथेतून उलगडत जातात. तरुणाईचा प्रेमळ अंदाज, हलकेफुलके प्रसंग आणि भावनिक वळणांची सुंदर सांगड घालत ‘तीन तिगाडा’ ही मालिका प्रेम, महत्त्वाकांक्षा आणि मोठे होताना घ्याव्या लागणाऱ्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांची गोष्ट सांगते.

 

अभिनेत्री प्रसन्ना बिष्ट म्हणाली, “तीन तिगाडा’च्या कथेमुळे ती हटके ठरते. कथा किती वास्तविक आणि समर्पक वाटते हे महत्त्वपूर्ण असते. जेव्हा आयुष्य आपण ठरविलेल्या योजनेनुसार चालत नाही, तेव्हा आपण कशाची निवड करतो हे महत्त्वाचे असते. एका विशिष्ट मार्गाने स्वत:ला पाहिजे त्या पद्धतीने जीवनप्रवासाचा शोध घेताना हळूहळू जीवन तुमच्यापुढे जे वाढून ठेवते ती स्थिती हाताळायला शिकण्याची संधी या भूमिकेने दिली या गोष्टीचा खरोखर आनंद वाटतो. मला वाटते की अनपेक्षित परिस्थिती हा प्रत्येकाच्या प्रवासाचा एक भाग असतो. कधीकधी, आपल्यासाठी असलेल्या दूरदृष्टीकडे परत जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी फक्त थोडे धैर्य लागते. मला वाटते की हे असं काहीतरी आहे जे तरुणाना आपलेसे वाटेल. कारण हा जीवनाचा तो टप्पा जिथे तुम्ही स्वतःला शोधून काढत आहात, निवड करत आहात, त्यांच्याकडून शिकत आहात आणि वाटेत गोष्टी शोधत आहात. प्रणय, विनोद, मजा आणि अनेक अनपेक्षित वळणांसह, तीन तिगाडा हे प्रत्येक गोष्टीचे एक सुंदर मिश्रण आहे. आता फक्त हिंदी Zee 5 वर प्रसारित होणारी ही मालिका पाहण्यासाठी मी खरोखरच उत्सुक आहे.”

 

अभिनेता दानेश रझवी म्हणाला, “तीन तिगाडा हा तरुण प्रणय, महत्त्वाकांक्षा आणि जीवन आणि प्रेमातील अनपेक्षितता यांच्या उत्साहाचा एक कार्यक्रम आहे. आयुष्य कसे पुढे जाते याबद्दल माझ्या पात्राच्या स्वतःच्या कल्पना आहेत. परंतु जीवन कधीही आपण ठरवलेल्या योजनेचे पालन करत नाही. जेव्हा लोक अनपेक्षित परिस्थितीत सापडतात आणि त्यांना कठीण निवडी कराव्या लागतात तेव्हा नातेसंबंध कसे बदलतात याचा शोध ही मालिका घेते. हलके क्षण तसेच भावनिक वळण असलेल्या कथेचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे आणि हिंदी Zee 5 वर तीन तिगाडा प्रेक्षकांसमोर कधी एकदा प्रदर्शित होईल याची आतुरतेने वाट पाहत आहे.”

 

तीन तिगाडा’चे खास स्ट्रीमिंग आता हिंदी Zee 5 वर!

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments