Thursday, November 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोठ्या प्रमाणावर एआय कौशल्ये विकसित करण्यासाठी कॉग्निझंटच्या वतीने चेन्नईमध्ये इमर्सिव्ह लर्निंग सेंटरचे...

मोठ्या प्रमाणावर एआय कौशल्ये विकसित करण्यासाठी कॉग्निझंटच्या वतीने चेन्नईमध्ये इमर्सिव्ह लर्निंग सेंटरचे अनावरण

 

 

 

 

तंत्रज्ञानाबरोबरच प्रतिभेला चालना देणारी ही सुविधा कॉग्निझंटच्या एआय बिल्डर धोरणाला बळकटी देते

 

 

 

चेन्नई, भारत, 19 नोव्हेंबर, 2026 – कॉग्निझंट (NASDAQ: CTSH), एआय बिल्डर तसेच तंत्रज्ञान सेवा पुरवठादाराने आज चेन्नईतील सिरूसेरी कॅम्पसमध्ये कॉग्निझंट इमर्सिव्ह लर्निंग सेंटर (सीआयएलसी) च्या पहिल्या टप्प्याचे अनावरण केले. हे जागतिक स्तरावर ग्राहकांसाठी एआय-संचालित प्रभाव चालविण्यासाठी सुसज्ज प्रतिभा विकसित करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला बळकटी देते.

 

 

 

भविष्यासाठी सज्ज (फ्यूचर-रेडी) शिकण्याचा अनुभव देण्यासाठी तयार केलेली सीआयएलसी समकालीन कार्यस्थळाची रचना, डिजिटल शिक्षण पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक-नेतृत्वाखालील शिक्षण, सहकार्य आणि कल्पनांना समर्थन देणारे लवचिक वातावरण एकत्र आणते. अंदाजे 1,65,000 चौरस फुटांवर पसरलेल्या या सुविधेमध्ये 1,822 शिकण्याच्या जागांसह 58 वर्ग, 208 बहुउद्देशीय जागा (मल्टीपर्पज सीटस्), सहयोगी जागा (कोलॅबरेटीव्ह स्पेस), बैठकीची खोली (मीटिंग रूम), एक वर्क कॅफे, ग्रंथालय आणि लवचिक टाऊन हॉल जागा आहेत. सीआयएलसी’चा टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाईल.

 

 

 

कॉग्निझंट इंडियाचे अध्यक्ष (ग्लोबल ऑपरेशन्स) तसेच अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजेश वारियर म्हणाले, “एआय बिल्डर म्हणून, आमचे लक्ष व्यवसायात बदल घडवून आणण्यासाठी एआयचा वापर करण्यावर तसेच आमच्या सहकाऱ्यांना त्या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर आहे. “कॉग्निझंट इमर्सिव्ह लर्निंग सेंटर आमच्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण, एआय-सक्षम उपाय तयार करताना आमचे कार्यबल शिकू आणि सहयोग करू शकतील अशा जागा तयार करण्यासाठी आमची निरंतर गुंतवणूक प्रतिबिंबित करते.”

 

“तंत्रज्ञानातील वेगवान प्रगतीमुळे निरंतर शिक्षणाला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कॉग्निझंटचे चीफ पीपल ऑफिसर कॅथी डायझ म्हणाल्या की, कार्यबल परिवर्तनातील एक नेता म्हणून आम्ही आमच्या सहकाऱ्यांना नवीन कौशल्ये तयार करण्यासाठी, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत वाढ करण्यासाठी संधी निर्माण करण्यासाठी लक्षणीय गुंतवणूक करत आहोत. “कॉग्निझंट इमर्सिव्ह लर्निंग सेंटर उद्देशाने तयार केलेल्या वातावरणात शिकणे आणि सहकार्य एकत्र आणते, ज्यामुळे आमच्या सहकाऱ्यांना एआय-नेतृत्वाखालील भविष्यात भरभराटीची क्षमता विकसित करण्यास मदत होते.”

 

एआय गुंतवणुकीचे उद्योजकीय परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक मानवी क्षमता निर्माण करून कॉग्निझंट आपले फ्रंटियर वर्कफोर्स मॉडेल पुढे नेत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, आपले फ्रंटियर-प्रमाणित कार्यबल 5,000 फ्रंटियर प्रमाणित अभियंते आणि 10,000 फ्रंटियर बिझनेस ऑपरेटर्सपर्यंत वाढवण्याची वचनबद्धता असल्याची घोषणा कंपनीने केली.

 

बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, कोईम्बतूर, दिल्ली-एनसीआर, गिफ्ट सिटी, हैदराबाद, इंदूर, कोची, कोलकाता, मंगळुरू, मुंबई, पुणे आणि विशाखापट्टणम येथे कॉग्निझंटची उपस्थिती आहे.

 

 

 

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments