या निकालामुळे प्रवासी आणि कॅप्टन्ससाठी अधिक निश्चितता निर्माण झाली असून, बाइक टॅक्सींच्या जबाबदार विस्ताराचा आणि नियमनाचा मार्गही मोकळा झाला आहे
नवी दिल्ली, २० नोव्हेंबर २०२६: भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात परवडणारा वन-स्टॉप मोबिलिटी प्लॅटफॉर्म असलेल्या रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने (Roppen Transportation Services Private Limited – रॅपिडो) आज कर्नाटक बाइक टॅक्सी प्रकरणातील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. हा निर्णय भारतातील बाइक टॅक्सी श्रेणीसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे कंपनीने म्हटले आहे. लाखो प्रवासी आणि कॅप्टन्सना सेवा देणाऱ्या या श्रेणीसाठी हा निकाल एक मोठे पाऊल आहे. त्याचबरोबर, राज्यांना स्पष्ट आणि व्यवहार्य बाइक टॅक्सी धोरणे तयार करण्यासाठी यामुळे भक्कम पाया मिळणार आहे. बाइक टॅक्सी प्रकरणात कर्नाटक राज्याने दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
हा निकाल भारतातील बाइक टॅक्सी श्रेणीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या अनेक वर्षांत ही श्रेणी उभी करण्यात रॅपिडोने आघाडीची भूमिका बजावली आहे. कमी अंतराच्या प्रवासासाठी तसेच फर्स्ट- आणि लास्ट-माइल प्रवासासाठी बाइक टॅक्सी हा एक महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे आला आहे. त्याचबरोबर, यामुळे लाखो कॅप्टन्सना कमाईच्या लवचीक संधी मिळाल्या असून, देशभरातील प्रवाशांना प्रवासाचे अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
रॅपिडोचे सह-संस्थापक पवन गुंटुपल्ली म्हणाले, “माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे कर्नाटकातील बाइक टॅक्सी श्रेणीबाबत आवश्यक स्पष्टता आली असून, भारतातील या क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. गेल्या काही वर्षांत बाइक टॅक्सींनी आपले महत्त्व सिद्ध केले आहे. गर्दीच्या शहरांमध्ये प्रवाशांना सहज ये-जा करण्यास मदत करून, फर्स्ट- आणि लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी मजबूत करून आणि कॅप्टन्ससाठी कमाईच्या लवचीक संधी निर्माण करून त्यांनी हे दाखवून दिले आहे. प्रत्यक्ष जमिनीवर ही श्रेणी आधीच बजावत असलेल्या भूमिकेला हा निकाल मान्यता देतो आणि मोबिलिटी इकोसिस्टममध्ये तिच्या सातत्यपूर्ण वाढीसाठी आणि एकात्मतेसाठी भक्कम पाया देतो.”
ते पुढे म्हणाले, “रॅपिडोसाठी हा केवळ कायदेशीर निकाल नाही. आम्ही सातत्याने ज्या गोष्टीवर विश्वास ठेवत आलो आहोत, त्याला मिळालेली ही पुष्टी आहे: लोक प्रत्यक्षात कसा प्रवास करतात, हे लक्षात घेऊन तयार केलेल्या मोबिलिटी सोल्युशन्सची भारताला गरज आहे. दुचाकी ही देशातील सर्वाधिक लोकांकडे असलेली आणि सहज उपलब्ध होणारी वाहने आहेत. लोकांना त्यांचा उत्पादक वापर करता आला, तर प्रवासी, कॅप्टन्स आणि शहरे, सर्वांसाठीच अर्थपूर्ण मूल्य निर्माण होऊ शकते. ही श्रेणी सुरक्षित, जबाबदार, नियमनाखालील आणि मोठ्या प्रमाणावरील अशा पुढील टप्प्यावर नेण्यासाठी कर्नाटक सरकारसोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
भारताच्या शहरी वाहतूक इकोसिस्टममध्ये बाइक टॅक्सी हा एक स्वतंत्र स्तर म्हणून पुढे आला आहे, विशेषतः एकट्याने करायच्या कमी अंतराच्या प्रवासासाठी आणि फर्स्ट- व लास्ट-माइल कनेक्टिव्हिटीसाठी. बंगळुरूसारख्या शहरांमध्ये प्रवाशांना वाहतूक कोंडी, विस्तारणारे मेट्रो नेटवर्क आणि दूरदूर पसरलेली रोजगार केंद्रे यांतून मार्ग काढावा लागतो. अशा ठिकाणी बाइक टॅक्सी बस, मेट्रो, ऑटो आणि कॅब यांच्याशी स्पर्धा करण्याऐवजी त्यांना पूरक ठरू शकतात. कॅप्टन्ससाठीही हे मॉडेल मोबिलिटी अर्थव्यवस्थेत सहभागी होणे सोपे करते, कारण यामुळे व्यक्तींना आपल्याकडे आधीच असू शकणाऱ्या दुचाकीतून उत्पन्न मिळवता येते.
कर्नाटकातील कायदेशीर स्थिती आता अधिक स्पष्ट झाल्यामुळे, पुढील टप्प्यात ही श्रेणी जबाबदारीने पुढे नेण्यावर भर दिला गेला पाहिजे, असे रॅपिडोचे मत आहे. भारताच्या मल्टिमॉडल वाहतूक इकोसिस्टमचा महत्त्वाचा भाग बनण्याची क्षमता असलेल्या या श्रेणीच्या वाढीसाठी रॅपिडो आपले तंत्रज्ञान, कार्यान्वयनाचा अनुभव आणि सुरक्षा यंत्रणा यांच्या माध्यमातून योगदान देत राहील.
समाप्त
रॅपिडोविषयी
रॅपिडो हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात परवडणारा वन-स्टॉप मोबिलिटी प्लॅटफॉर्म असून, सुरक्षितता, परवडणारी किंमत आणि विश्वासार्हता यांवर भर देत फर्स्ट- आणि लास्ट-माइल कनेक्टिव्हिटीची नवी व्याख्या करत आहे. गेल्या काही वर्षांत तो ‘व्हील्स ऑफ भारत’ म्हणून पुढे आला असून, त्याने भारतीयांच्या दैनंदिन प्रवासाच्या सवयी बदलल्या आहेत आणि सहज प्रवास हा रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे.
२०१५ मध्ये स्थापन झालेला रॅपिडो देशाच्या सामाजिक जडणघडणीचा भाग बनला आहे. बाइक टॅक्सी, ऑटो-रिक्षा, कॅब, पार्सल डिलिव्हरी, फ्लाइट बुकिंग आणि फूड डिलिव्हरी अशा सेवांचा समावेश असलेल्या आपल्या एकात्मिक, तंत्रज्ञानाधारित इकोसिस्टमच्या माध्यमातून रॅपिडो ४०० हून अधिक शहरांमध्ये प्रवासाचे स्वरूप बदलत आहे. टियर २ आणि टियर ३ बाजारपेठांमध्येही त्याची सखोल पोहोच आहे.
रॅपिडोचा SaaS-आधारित प्लॅटफॉर्म कॅब आणि ऑटो-रिक्षा चालवणाऱ्या कॅप्टन्सना कमाईच्या लवचीक आणि शाश्वत संधी उपलब्ध करून देतो. भारतात ९० लाखांहून अधिक जणांच्या उपजीविकेला आधार देणारा रॅपिडो प्रवास सहज, सर्वसमावेशक आणि शाश्वत बनवण्याच्या ध्येयाने काम करत असून, भारताच्या मोबिलिटी इकोसि
स्टमचे भविष्य घडवण्यात हातभार लावत आहे.


