पुणे, दि. २०: इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या व पुढील शैक्षणिक वर्षामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेऊ इच्छिणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव (Online) आवश्यक कागदपत्रासह संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे कार्यक्षेत्र विचारात घेऊन संबंधित समिती कार्यालयास प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या ३० नोव्हेंबर, अखेरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यक्षेत्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी काही विद्यार्थ्यांना NEET, CET, JEE सारख्या प्रवेश परिक्षा करीता वैधता प्रमाणपत्राची गरज भासत असल्याने अशा विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रकरणासाठी विहित कागदपत्रांसह अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कपिल टॉवर्स, सी विंग, पाचवा मजला, पुणे आर. टी. ओ. कार्यालयाशेजारी, संगम पुलाजवळ, पुणे-४११००१ (संपर्क नंबर- ०२०-२६०५७९६१) या पत्यावर संपर्क साधावा.
संबंधित अनुसूचित जमात (S.T.) प्रवर्गच्या अर्जदाराने ऑनलाईन अर्ज आदि प्रमाण प्रणाली http://etribevalidity.mahaonline.gov.in संकेत स्थळावर भरणे अनिवार्य आहे व त्याची एक प्रत ऑफलाईन पध्दतीने या समितीस सादर करणे अनिवार्य आहे.
*अर्जासोबत जोडवयाची कागदपत्रे*
ऑनलाईन आदि प्रमाण प्रणालीद्वारे भरलेला अर्ज (नमुना-ई मधील), उपविभागीय अधिकारी यांचेकडील (नमुना “C” मधील) जातीचे मुळ प्रमाणपत्र व झेरॉक्स, नाते संबंध दर्शविणारे वंशावळीचे प्रतिज्ञापत्र (नमुना “फ” मधील) रु.१००/-च्या स्टॅम्पपेपर, ५० रक्त संबंधातील नातेवाईकांची वैधता प्रमाणपत्रे उपलब्ध असल्यास त्यासोबत रु. ५००/-च्या स्टॅम्पपेपरव प्रतिज्ञापत्र, अर्जदारचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराचा माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला,अर्जदाराचा शालेय प्रवेश नोंदवहीचा उतारा, आधार कार्ड प्रत जन्म नोंद प्रत, बोनाफाईड सर्टिफिकेट प्रत जोडावे.
अर्जासोबत वडीलांचे प्राथमिक, माध्यमिक शाळा सोडल्याचे दाखले, वडीलांचा शालेय प्रवेश नोंदवहीचा उतारा, वडीलांचे आधारकार्ड, वडीलांचे जन्मनोंद प्रत / दाखला,सख्ये काका / सख्खी आत्या/ चुलत काका / चुलत आत्या यांचे प्राथमिक / माध्यमिक शाळा सोडल्याचे दाखला, नमुना-१४ जन्म मृत्यू नोंद उतारा, काकांचे शालेय प्रवेश नोंदवहीचा उतारा,
सख्ये आजोबा/ सख्खी आजी / चुलत आजोया / चुलत आजी यांचे प्राथमिक / माध्यमिक शाळा सोडल्याचे दाखले व गाव, नमुना-१४ जन्म मृत्यु नोंद उतारा, आजोबांचे शालेय प्रवेश नोंदवहीचा उतारा, आजोबांचे मृत्यु प्रमाणपत्र, सख्ये पंजोबा/सख्खी पंजी / चुलत पंजोबा / चुलत पंजी यांचे प्राथमिक / माध्यमिक शाळा सोडल्याचे दाखले, चुलत काका चुलत काकु / चुलत आजी / चुलत आजोबा/चुलत पंजोबा / चुलत पंजी यांचा पुरावा असल्यास रु.५००/- च्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील.
पंजोबांचा शालेय प्रवेश नोंदवहीचा उतारा, रक्तसंबंधी नातेवाईकांच्या जन्म / मृत्यू नोंदवहीचा उतारा,
आदिवासी नोंद असल्याचा ७/१२ उतारा / फेरफार / बंदोबस्त मिसल/पी-१/पी-२/पी-६/पी-१. वनहक्क पट्टे आदेश प्रत, इतर १९५० पुर्वीचे दस्ताऐवज असल्याचा पुरावा जोडावे.रक्त संबंधातील इतर नातेवाईकांचे प्राथमिक/ माध्यमिक शाळा सोडल्याचे दाखले / प्रवेश नोंदवहीचे उतारे जोडावे. अनुसूचित जमातीचे दाव्यासंबंधी अन्य कोणतेही दस्ताऐवज किंवा पुरावे आणि न्यायालयीन आदेश तसेच प्रकरणाशी संबंधीत इतर माहितीचे पुरावे असल्यास जोडावेत, असे आवाहन तपासणी समितीचे सह आयुक्त आत्माराम धाबे यांनी केले आहे.
०००००


