Saturday, November 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाईड मार्जिन, फ्रंट मार्जिन मध्ये कारवाई स्वागतार्ह, मात्र तेथे अनधिकृत व्यवसाय सुरूच,...

साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन मध्ये कारवाई स्वागतार्ह, मात्र तेथे अनधिकृत व्यवसाय सुरूच, पोलिसात गुन्हे दाखल करा… संदीप खर्डेकर

, पुणे- साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन मध्ये कारवाई स्वागतार्ह, मात्र तेथे अनधिकृत व्यवसाय सुरूच, पोलिसात गुन्हे दाखल करा… अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुण्याचे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे की

 

सर्वप्रथम अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विरोधात आपण घेतलेल्या ठाम भूमिकेबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. समस्त सुजाण पुणेकर आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत याची खात्री बाळगा.

मात्र आपल्याला

मी 16 मार्च 2026 रोजी पाठवलेल्या निवेदनात अतिक्रमण विरोधी कारवाई बाबत ची सत्य परिस्थिती कथन केली होती.( सोबत त्याची प्रत जोडली आहेच ) तशीच परिस्थिती आजही असल्याचे दिसून येते.

फ्रंट मार्जिन व साईड मार्जिन मधील शेड पाडल्या मात्र त्या जागेत व्यवसाय व्यवस्थित सुरू असल्याचे चित्र आहे.

कालांतराने कारवाई शिथिल झाल्यावर येथे पुन्हा शेड उभ्या राहतील याबद्दल शंका नाही. जर प्रशासन अश्या कारवाई बाबत खरंच गंभीर असेल तर अश्या पद्धतीने साईड, फ्रंट मार्जिन मध्ये व्यवसाय करणाऱ्यांना कायमचे बंद करायचे असल्यास त्यांच्या विरुद्ध एम आर टी पी ऍक्ट 1966 मधील तरतूदीनुसार गुन्हे दाखल करावेत अशी आग्रही मागणी करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments