Monday, November 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे...

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र

पुणे, २३ नोव्हेंबर २०२६: पुणेस्थित अजिल फायबरटेक प्रायव्हेट लिमिटेड या विशेष वाहनांच्या तसेच बसच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील कंपनीच्या अजिलला “लिगसी” श्रेणीतील १३.५ मीटर लांबीच्या वातानुकूलित स्लीपर बस (कोच) साठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)ने प्रमाणपत्र बहाल केले आहे. या कोचला बस सुरक्षेसंदर्भातील एआयएस-०५२, एआयएस-११९ आणि एआयएस-१५३ या तीन राष्ट्रीय मानकांनुसार मान्यता मिळाली आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यातील नेरे येथील कंपनीच्या उत्पादन केंद्रात या बसची निर्मिती करीत आहे . या श्रेणीमध्ये पूर्ण स्लीपर तसेच सीटर्स-कम-स्लीपर अशा दोन्ही प्रकारांचा समावेश आहे. अशी माहिती अजिल फायबरटेकचे व्यवस्थाकीय संचालक सजी वर्की यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

यावेळी संचालक अजिल सजी अमल सजी, बाबू नायर, अयाज पटेल मुख्तार अहमद, अभय पांडे आदी उपस्थित होते.

 

सजी वर्की म्हणाले की,

केंद्र सरकारने स्लीपर बसच्या सुरक्षेसंदर्भातील नियम अधिक कडक केले असून, निर्धारित राष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. या नियमांचा उद्देश बसची संरचनात्मक मजबुती, प्रवाशांची सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था सुनिश्चित करणे हा आहे. या प्रमाणपत्रामुळे महाराष्ट्रात निर्मित आणि राष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या स्लीपर कोचचा पर्याय बस ऑपरेटर्सना उपलब्ध होणार आहे.

 

ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स (एआयएस) अंतर्गत बस सुरक्षेच्या विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. एआयएस-०५२ मध्ये बसच्या बॉडीची मजबुती, प्रवाशांच्या हालचालींसाठी पुरेशी जागा, दरवाजे, खिडक्या आणि प्रकाशव्यवस्था यांसारख्या मूलभूत बाबींचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. एआयएस-११९ मध्ये स्लीपर कोचसाठी अतिरिक्त सुरक्षा तरतुदी असून, त्यामध्ये बर्थची निर्धारित मापे, वरच्या बर्थवर जाण्यासाठी सुरक्षित व्यवस्था, प्रत्येक बर्थवरून उपलब्ध होऊ शकणारे आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि अग्निरोधक अंतर्गत साहित्य यांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२५ पासून नव्या बससाठी अनिवार्य झालेल्या एआयएस-१५३ या मानकामुळे आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, अग्निसुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसंदर्भातील निकष अधिक कडक करण्यात आले आहेत.

 

अजिल लेगसी कोचमध्ये प्रत्येक बर्थजवळ उपलब्ध असलेल्या आपत्कालीन खिडक्या, छतावरील आपत्कालीन एक्झिट हॅच, स्वतंत्र आपत्कालीन बाहेर पडण्याचा दरवाजा, प्रत्येक बर्थजवळ काच फोडण्यासाठी हातोडे, मजबूत सुरक्षा काचा, प्रवासी कक्षात अग्निरोधक साहित्य अशा विविध सुरक्षा सुविधा देण्यात आल्या आहेत.

 

अजिल फायबरटेकने २००२ मध्ये फायबर रिइन्फोर्स्ड प्लास्टिक (एफआरपी) घटकांच्या निर्मितीपासून आपला प्रवास सुरू केला. सुरुवातीला प्रोप्रायटरशिप स्वरूपात कार्यरत असलेल्या कंपनीचे २०२२ मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतर झाले. दोन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये रुग्णवाहिका, मोबाइल वैद्यकीय युनिट्स, अग्निशमन व बचाव वाहने, पोलीस व संरक्षण दलांसाठीची विशेष वाहने आणि प्रवासी कोच यांचा समावेश आहे. शालेय वाहतूक, कर्मचारी वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठीच्या बसची मागणी लक्षात घेऊन कंपनीने २०२५ मध्ये रिटेल बस क्षेत्रात प्रवेश केला.

 

५ सप्टेंबर २०२६ रोजी कंपनीने अद्ययावत उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले. या सुविधेमध्ये बेकिंग व्यवस्थेसह १८ मीटर लांबीचा पेंट बूथ, वाहनांच्या पाणी गळतीची चाचणी घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तसेच फॅब्रिकेशन आणि अंतिम असेंब्लीसाठी स्वतंत्र शेड्स उभारण्यात आले आहेत. या विस्तारित सुविधेमुळे दरवर्षी १५०० विशेष वाहनांच्या बॉडी निर्मितीची क्षमता उपलब्ध झाली आहे. आगामी आर्थिक वर्ष २०२७-२८ मध्ये १५० हून अधिक बससाठी बस बॉडी निर्मितीचे कंपनीचे नियोजन आहे.

 

“स्लीपर बसमधून रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आपले प्रियजन सुरक्षितपणे घरी पोहोचतील, याची खात्री हवी असते. अजिल लेगसी विकसित करताना हाच विश्वास आमच्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी होता. या प्रमाणपत्रामुळे आमच्या कोचची निर्धारित सुरक्षा मानकांनुसार तपासणी झाली असून ते देशातील विहित सुरक्षा निकषांची पूर्तता करतात, याची पुष्टी झाली आहे. हे यश मिळवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल आणि चिकाटीबद्दल मी आमच्या बस विभागातील संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. या प्रमाणपत्रामुळे महाराष्ट्रासह देशभरातील बस ऑपरेटर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे अजिल फायबरटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमल साजी यांनी सांगितले.

 

अजिल फायबरटेक प्रायव्हेट लिमिटेडविषयी

 

पुण्यात मुख्यालय असलेली अजिल फायबरटेक प्रायव्हेट लिमिटेड ही विशेष वाहनांच्या बॉडी निर्मिती आणि विशिष्ट उपयोगांसाठीच्या वाहनांच्या निर्मिती क्षेत्रातील कंपनी आहे. व्यावसायिक वाहनांच्या चॅसिसचे आवश्यकतेनुसार विशेष वाहनांमध्ये रूपांतर करण्याचा कंपनीला दोन दशकांहून अधिक अनुभव आहे. अग्निशमन व बचाव वाहने, रुग्णवाहिका, मोबाइल वैद्यकीय युनिट्स, सुरक्षा व संरक्षण दलांसाठीची वाहने आणि प्रीमियम प्रवासी कोच ही कंपनीची प्रमुख उत्पादन श्रेणी आहे.

 

कंपनी भारतातील आघाडीच्या वाहन चॅसिस उत्पादकांसोबत काम करते. तसेच केंद्र व राज्य सरकारची विविध विभागे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, शैक्षणिक व संशोधन संस्था आणि देशभरातील खासगी ऑपरेटर्सना सेवा पुरवते. अभियांत्रिकी, डिझाइन, संशोधन व विकास आणि उत्पादन क्षमतांच्या बळावर कंपनी विशेष वाहन निर्मिती आणि प्रवासी वाहतूक क्षेत्रातील आपला विस्ता

र करत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments