Wednesday, November 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाईनामाच्या जयघोषात श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्थेचा साई उत्सव कर्वेनगर येथील श्री...

साईनामाच्या जयघोषात श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्थेचा साई उत्सव कर्वेनगर येथील श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्था

पुणे : कर्वेनगर येथील श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्थेच्या वतीने आयोजित १८ व्या साई उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. उत्सवानिमित्त श्री साई पालखीचे आगमन झाले. यावेळी यावेळी साईभक्तांनी पालखीचे उत्साहात स्वागत करून पादुकांचे दर्शन घेतले. पालखी मार्गावर फुलांंची उधळण करण्यात आली. फुलांनी सजविलेल्या आणि विद्युत रोषणाई केलेल्या रथात साईबाबांंची मूर्ती विराजमान झाली होते. साईनामाचा जयघोष करीत भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले.

 

श्री साई मूर्तीचे मंगलस्नान, श्री साई पादुकांची महापूजा व अभिषेक (दत्तयाग), श्री साई सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, साईबाबांची सांज आरती आणि महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम झाले. तसेच गायक सोनू भाऊ साठे यांच्या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुषार कैलास झेंडे,उत्सव प्रमुख कुमार लांडे, विजय मोरे, दिनेश गालफाडे, विजय साळवे, ओमकार लांडगे, अमोल शिंदे, संदीप गवळी, योगेश झेंडे, कैलास जाधव, वैभव नवसे, संजय पवळे आणि इतर मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

तुषार झेंडे म्हणाले, साई उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रम राबविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी (२९ नोव्हेंबर) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. साईभक्तांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments