(डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून इक्विटी आणि डेटमध्ये मर्यादित शॉर्ट एक्सपोजरसह इक्विटी आणि डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणारी इंटरव्हल इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी)
बाजारपेठ चक्रांमधील संधींचा लाभ घेण्यासाठी निश्चित उत्पन्न आणि आर्बिट्राजसह लाँग व शॉर्ट पोझिशन्सची लवचिकता एकत्र आणणारे अनुकूल हायब्रिड धोरण
मुंबई, २६ नोव्हेंबर २०२६: महिंद्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंडने आज एमएसआयएफ हायब्रिड लाँग-शॉर्ट फंडच्या (‘इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी’) लाँचची घोषणा केली. ही इंटरव्हल इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आहे, जी डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून इक्विटी आणि डेटमधील मर्यादित शॉर्ट एक्सपोजरसह इक्विटी आणि डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करते. ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी महिंद्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंडचा स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (एसआयएफ) प्लॅटफॉर्म एमएसआयएफ अंतर्गत सादर करण्यात आली आहे.
या योजनेची न्यू फंड ऑफर (एनएफओ) २७ नोव्हेंबर २०२६ रोजी उघडेल आणि ११ डिसेंबर २०२६ रोजी बंद होईल. ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी २१ डिसेंबर २०२६ पासून सातत्यपूर्ण खरेदी आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा खुली होईल.
पोर्टफोलिओ पोझिशनिंगची लवचिकता हे या फंडाचे मुख्य वेगळेपण आहे. पारंपारिक लाँग-ओन्ली हायब्रिड फंडाच्या तुलनेत-जो केवळ इक्विटी एक्सपोजर कमी करून बाजारपेठेबद्दल सावध दृष्टिकोन व्यक्त करू शकतो. एमएसआयएफ हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड आपल्या गुंतवणूक दृष्टिकोनाचा भाग म्हणून निव्वळ मालमत्तेच्या २५ टक्क्यांपर्यंत अनहेज्ड शॉर्ट पोझिशन्स घेण्याचे, विहित नियामक मर्यादेच्या अधीन राहून ऑप्शन स्ट्रॅटेजीजचा वापर करण्याचे आणि आयपीओ, बायबॅक, विलीनीकरण, विलगीकरण इत्यादी विशेष परिस्थितींमध्ये सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवतो. यामुळे गुंतवणूक टीमला इक्विटी आणि निश्चित उत्पन्नातील मुख्य वाटप कायम राखत विविध बाजारपेठ परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी अधिक व्यापक साधने मिळतात.
हायब्रिड लाँग-शॉर्ट स्ट्रॅटेजी दोन पूरक दृष्टिकोन एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवते. स्थिरता दृष्टिकोन, ज्यामध्ये डेट आणि मनी मार्केट साधने, तसेच कॅश-फ्युचर्स आर्बिट्राजचा समावेश आहे, ज्यामुळे पोर्टफोलिओतील चढ-उतार कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. वाढीव परतावा क्षमता दृष्टिकोन निवडक लाँग आणि शॉर्ट धोरणे, कव्हर्ड कॉल्स, स्ट्रॅडल्स, स्ट्रँगल्स आणि ऑप्शन स्प्रेड्स यांसारख्या डेरिव्हेटिव्ह धोरणांचा, तसेच अतिरिक्त जोखीम-समायोजित परतावा मिळवून देण्यास मदत करू शकणाऱ्या विशेष परिस्थितीतील संधींचा वापर करतो.
प्रस्तावित पोर्टफोलिओ रचना दृष्टिकोनानुसार, ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आर्बिट्राज पोझिशन्ससह इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये ६५ ते ७५ टक्के; टी-बिल्स, सीडी, सीपी, जी-सेक, एसडीएल आणि कॉर्पोरेट बाँड्स यांसारख्या डेट आणि मनी मार्केट साधनांमध्ये २५ ते ३५ टक्के आणि इनव्हिट्समध्ये (InvITs) १० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करेल. इक्विटीमध्ये, गुंतवणूक टीम बाजारपेठेच्या दृष्टिकोनावर आधारित ग्रॉस इक्विटी आणि आर्बिट्राज दरम्यान गतिमानपणे बदल करण्याचे उद्दिष्ट ठेवते, जिथे बाजारपेठेचा कल सकारात्मक असेल तेव्हा निव्वळ इक्विटी एक्सपोजर वाढवणे आणि दृष्टिकोन सावध झाल्यास आर्बिट्राजकडे वळणे असे हे धोरण असेल. प्रस्तावित वाटप सूचक आहे, जे इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट आणि लागू नियमांच्या अधीन आहे.
या लाँचबाबत मत व्यक्त करत महिंद्रा मॅन्युलाईफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ अँथनी हेरेडिया म्हणाले: “स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स म्युच्युअल फंडांच्या नियामक आणि प्रकटीकरण चौकटीत अत्याधुनिक गुंतवणूक धोरणे आणून गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी उघडतात. एमएसआयएफ हायब्रिड लाँग-शॉर्ट फंडसह आम्ही निश्चित उत्पन्न आणि आर्बिट्राजला लाँग आणि शॉर्ट इक्विटी पोझिशन्सच्या लवचिकतेची जोड देणाऱ्या अनुकूल, बहुआयामी दृष्टिकोनाद्वारे हायब्रिड गुंतवणुकीला पुढे नेत आहोत. हे व्यापक गुंतवणूक साधन सर्व बाजारपेठ चक्रांमध्ये इक्विटी सहभाग शोधत असताना बदलत्या बाजारपेठ परिस्थितींना प्रतिसाद देण्याची लवचिकता प्रदान करते.”
गुंतवणूक निर्णय तीन-स्तरीय प्रक्रियेचे पालन करतात. व्याजदर, महागाई, विकास दर, निधी प्रवाह, तरलता आणि भू-राजकीय जोखीम यांचा समावेश असलेले मॅक्रो अॅनालिसिस पोर्टफोलिओचे निव्वळ एक्सपोजर निश्चित करण्यास मदत करेल. समभागांची निवड टॉप-डाऊन आणि बॉटम-अप संशोधनाचा मेळ घालेल, ज्यामध्ये मूल्यांकनातील तफावत आणि संभाव्य उत्प्रेरक घटक ओळखण्यासाठी वाढ, मूल्यांकन, रोख प्रवाह आणि व्यवस्थापनाची गुणवत्ता यांचे मूल्यमापन केले जाईल. या प्रक्रियेला जोखीम व्यवस्थापनाचे पाठबळ आहे, जे एकल-समभाग आणि क्षेत्र मर्यादा, समभाग-स्तरीय आणि पोर्टफोलिओ हेज आणि ड्रॉडाउन ट्रिगर्ससह जोखीम सुरक्षा उपाय लागू करते.
महिंद्रा मॅन्युलाईफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे इक्विटीचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर कृष्णा संघवी म्हणाले: “इक्विटी, आर्बिट्राज आणि शॉर्ट संधींमध्ये इक्विटी पोर्टफोलिओची गतिमान मांडणी करणे हा आमचा दृष्टिकोन आहे. प्रत्येक शॉर्ट पोझिशन लाँग पोझिशनप्रमाणे शिस्तबद्ध संशोधनाने घेतली जाते, ज्याला विकास, रोख प्रवाह, व्यवस्थापन आणि मूल्यांकन यांसारख्या मापदंडांचा समावेश असलेल्या आमच्या अंतर्गत गुंतवणूक आराखड्यावरील स्पष्ट प्रेरक घटकाचे पाठबळ असते. हालचालीची दिशा वेगळी असू शकते, पण गुंतवणूक प्रक्रिया आणि पोर्टफोलिओ शिस्त तीच राहते. निश्चित उत्पन्न पोर्टफोलिओ दृष्टिकोन आणि निश्चित जोखीम मर्यादांसह, सर्व बाजारपेठ चक्रांमध्ये सहभागी होऊ शकणारा अनुकूल गुंतवणूक आराखडा देण्याचे फंडाचे उद्दिष्ट आहे.”
निश्चित उत्पन्न दृष्टिकोन प्रामुख्याने लघु ते मध्यम-मुदतीच्या कालावधीसह उच्च-दर्जाच्या डेट साधनांवर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामध्ये अतिरिक्त उत्पन्नासाठी मध्यम उच्च क्रेडिट जोखमीकडे मोजके वाटप केले जाते. क्रेडिट निवड व्यवस्थापनाची गुणवत्ता, आर्थिक सामर्थ्य आणि व्यवसायाची मूलतत्त्वे तपासण्यावर लक्ष केंद्रित करेल, ज्याला सक्रिय क्रेडिट देखरेख आणि ताळेबंदाची ताकद, रेटिंग्ज आणि क्षेत्रीय बाबींवर आधारित जारीकर्तानुसार मर्यादांचे पाठबळ असेल.
या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीचे व्यवस्थापन श्री. आलाप शाह (इक्विटी), श्री. अभिषेक जयस्वाल (इक्विटी), श्री. अमित गर्ग (निश्चित उत्पन्न) आणि श्री. कुश सोनीगरा (निश्चित उत्पन्न) करतील. आलाप शाह यांना भारतातील इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह्ज बाजारपेठेत २० वर्षांहून अधिक अनुभव आहे, ज्यामध्ये लाँग-ओन्ली आणि लाँग/शॉर्ट पोर्टफोलिओ व्यवस्थापन, संशोधन आणि जोखीम व्यवस्थापनाचा समावेश आहे. अभिषेक जयस्वाल यांना गुंतवणूक व्यवस्थापनाचा १८ वर्षांहून अधिक अनुभव आहे, ज्यामध्ये म्युच्युअल फंड, एआयएफ, पीएमएस आणि हेज फंड मँडेट्समधील लाँग/शॉर्ट पोर्टफोलिओमध्ये एक दशकाहून अधिक काळाच्या विशेष कौशल्याचा समावेश आहे. अमित गर्ग यांना निश्चित उत्पन्न व्यवहार आणि फंड व्यवस्थापनाचा १९ वर्षांहून अधिक अनुभव आहे, तर कुश सोनीगरा यांना मालमत्ता व्यवस्थापन, निश्चित उत्पन्न व्यवहार आणि क्रेडिट व व्याजदर संशोधनाचा जवळपास १५ वर्षांचा अनुभव आहे.
ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी हायब्रिड इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी श्रेणीत (हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड) येते आणि या स्ट्रॅटेजीचे बेंचमार्किंग क्रिसिल हायब्रिड ५०+५० – मॉडरेट इंडेक्स विरुद्ध केले जाईल. इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीच्या वैशिष्ट्यांच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित, एनएफओ टप्प्यावर स्ट्रॅटेजीला एएमएफआयने निर्दिष्ट केल्यानुसार रिस्क बँड लेव्हल २ नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक झाल्यानंतर हा रिस्क बँड बदलू शकतो.
ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून इक्विटी आणि डेटमधील मर्यादित शॉर्ट एक्सपोजरसह प्रामुख्याने इक्विटी आणि डेट सिक्युरिटीजमधील गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन भांडवल वाढ आणि उत्पन्न निर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे.
अधिक तपशीलांसाठी, कृपया एमएमआयएमपीएल आणि कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडच्या आयएससींवर, तसेच https://www.mahindramanulife.com/msif वर उपलब्ध असलेले एमएसआयएफ हायब्रिड लाँग-शॉर्ट फंडचे इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट आणि की इन्फॉर्मेशन मेमोरँडम वाचा.
महिंद्रा मॅन्युलाईफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि महिंद्रा मॅन्युलाईफ ट्रस्टी प्रायव्हेट लिमिटेड बाबत
महिंद्रा मॅन्युलाईफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (एमएमआयएमपीएल) महिंद्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट मॅनेजर (गुंतवणूक व्यवस्थापक) म्हणून कार्य करते. २९ एप्रिल २०२० रोजी, एमएमएफएसएलने ५१:४९ संयुक्त उद्यम स्थापन करण्यासाठी एमएमआयएमपीएलमधील ४९ टक्के हिस्सा मॅन्युलाईफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट (सिंगापूर) प्रा. लि. ला विकला. महिंद्रा मॅन्युलाईफ ट्रस्टी प्रायव्हेट लिमिटेड (एमएमटीपीएल) महिंद्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंड (पूर्वीचा महिंद्रा म्युच्युअल फंड) साठी विश्वस्त (ट्रस्टी) म्हणून कार्य करते. २९ एप्रिल २०२० रोजी, एमएमएफएसएलने ५१:४९ संयुक्त उद्यम स्थापन करण्यासाठी एमएमटीपीएलमधील ४९ टक्के हिस्सा मॅन्युलाईफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट (सिंगापूर) प्रा. लि. ला विकला.
महिंद्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंडबद्दल अधिक माहिती www.mahindramanulife.com / ट्विटर, फेसबुक, लिंक्डइन, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम @mahindramanulifemutualfun
d येथे जाणून घ्या.


