Friday, November 27, 2026
Google search engine
HomeUncategorized*अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन*

*अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन*

 

 

पुणे, दि.२७: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाचे सोमवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सारथी संकुल, पुणे येथे उद्घाटन होणार आहे.

 

या कार्यालयाचे उद्घाटन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सतीशकुमार खडके, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश रणखांब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांमधील तरुण-तरुणींना स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी विविध आर्थिक सहाय्याच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय व उद्योग उभारून आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली आहे. महामंडळाच्या नूतन कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अधिक सुलभ, प्रभावी व गतिमान सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

या समारंभास महामंडळाचे सर्व लाभार्थी, मराठा समाजासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्था व संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते, यशस्वी मराठा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व सारथी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments