Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक हिमोफिलिया दिनाची रुग्णांमध्ये जनजागृती

जागतिक हिमोफिलिया दिनाची रुग्णांमध्ये जनजागृती

पिंपरी पुणे – डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या वतीने डॉ. शैलजा माने, विभागप्रमुख, बालरोग आणि डॉ. ज्ञानेश्वर उपासे, डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथे सल्लागार हेमॅटोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाला डॉ. जे.एस. भवाळकर, अधिष्ठाता – डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. पी.वत्सला स्वामी – शैक्षणिक विभगाच्या संचालिका तसेच हेमोफिलिया सोसायटी ऑफ महाराष्ट्र (एचएसएम) पुणे विभागाच्या पदाधिकारीसह श्री. रशीद लिलानी-अध्यक्ष, डॉ. एस के राऊत- एचएसएमचे उपाध्यक्ष, डॉ. सुनील लोहाडे- एचएसएमचे उपाध्यक्ष वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

 

डॉ.शैलजा माने यांनी हिमोफिलिया आजाराविषयी थोडक्यात माहिती दिली, तसेच डॉ. भवाळकर यांनी रोगाचा इतिहास विशद केला, तर श्री. रशीद लिलानी यांनी उपचारासाठी उपलब्ध सेवा सुविधांची माहिती व समाजामध्ये आरोग्य विषयक जागरूकता वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले आणि डॉ. ज्ञानेश्वर उपासे यांनी हिमोफिलियावरील उपचाराच्या अद्ययावत पर्यायांविषयी माहिती दिली.

 

तसेच हिमोफिलियाच्या रूग्णांसाठी रेखांकन, स्केचिंग, पेंटिंग, रंगरंगोटी इत्यादी सारख्या विविध प्रोत्साहनात्मक उपक्रमांसह बक्षिसे देण्यात आली होती त्यामुळे सर्व हिमोफिलिया रुग्णांनी या कार्यक्रमात डॉक्टांराशी संवाद साधला आणि स्वादिष्ट भोजन घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments