Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमावळ लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती*

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती*

 

पुणे, दि. २४: जिल्ह्यातील ३३- मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.

 

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुधांशू राय यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, क्वीन्स गार्डन, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-२०१असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९०२२६९०६६७ आणि इमेल आयडी expobs33maval@gmail.com असा आहे. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सचिन चाटे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४२१२७९५६६ असा आहे.

 

निवडणूक खर्च निरीक्षक मावळ लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह पुणे येथे भेटण्याची वेळ मंगळवार व शुक्रवार सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही मावळ लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments