Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सकडून नाविन्‍यतेला गती: आर्थिक वर्ष २०२४ मध्‍ये २२२ पेटण्‍ट्स दाखल केले...

टाटा मोटर्सकडून नाविन्‍यतेला गती: आर्थिक वर्ष २०२४ मध्‍ये २२२ पेटण्‍ट्स दाखल केले आणि ३३३ अनुदान मिळवले

राष्‍ट्रीय, एप्रिल २५, २०२४: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल कंपनीने पुन्‍हा एकदा इंटेलेक्‍चुअल प्रॉपर्टी राइट्स (आयपीआर) निर्मितीप्रती मोठा टप्‍पा संपादित केला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ दरम्‍यान दाखल केलेले २२२ पेटण्‍ट्स आणि ११७ डिझाइन्‍स अर्जांची विक्रमी नोंद केली आहे, जी तिच्‍या इतिहासामध्ये सर्वोच्‍च आहे. या फाइलिंग्‍ज उत्‍पादन व नाविन्‍यपूर्ण प्रक्रियांच्‍या व्‍यापक श्रेणीसाठी करण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍यामध्‍ये प्रमुख ऑटोमोटिव्‍ह मेगाट्रेण्‍ड्स जसे कनेक्‍टीव्‍हीटी, इलेक्ट्रिफिकेशन, सस्‍टेनेबिलिटी व सेफ्टी (सीईएसएस) यांचा उल्‍लेख करण्‍यात आला आहे. तसेच यामध्‍ये पॉवरट्रेन, बॉडी अँड ट्रिम, सस्‍पेंशन, ब्रेक्‍स, एचव्‍हीएसी आणि उत्‍सर्जन नियंत्रण अशा विविध वेईकल सिस्‍टम्‍सचा देखील समावेश आहे. टाटा मोटर्सला याच कालावधीदरम्‍यान ३३३ पेटण्‍ट्सचे आतापर्यंतचे सर्वोच्‍च अनुदान देखील मिळाले, ज्‍यामुळे अनुदान मिळालेल्‍या पेटण्‍ट्सची एकूण आकडेवारी ८५० हून अधिकपर्यंत पोहोचली आहे.

 

टाटा मोटर्सची अभियांत्रिकी उत्कृष्टता, अत्याधुनिक पॉवरट्रेन्स, डिझाइन, कनेक्टिव्हिटी आणि इंटेलिजेंट सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दलची दृढ वचनबद्धता कंपनीच्या नवकल्पनांना वास्तविक-जगातील गरजांशी संरेखित करते. ग्राहकांचे आरोग्य आणि पर्यावरणीय व्‍यवस्‍थापनाला प्राधान्‍य देत कंपनीच्‍या उद्देशपूर्ण संशोधन व नाविन्‍यपूर्ण प्रयत्‍नांमधून अधिक कार्यक्षम, हरित व सुरक्षित वाहनांचे उत्‍पादन करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे अंतिम वापरकर्त्‍यांना फायदा होण्‍यासोबत उद्योगामध्‍ये आमूलाग्र बदल घडून येत आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्‍ये टाटा मोटर्सला इंटेलेक्‍चुअल प्रॉपर्टी राइड्स (आयपीआर) मधील सर्वोत्तम कामगिरीसाठी जागतिक ख्‍यातीचे पाच प्रतिष्ठित पुरस्‍कार व सन्‍मान मिळाले.

 

या यशस्‍वी टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सचे अध्‍यक्ष व चीफ टेक्‍नॉलॉजी ऑफिसर राजेंद्र पेटकर म्‍हणाले, ”टाटा मोटर्सच्‍या संशोधन व नाविन्‍यतेप्रती अविरत कटिबद्धतेने आम्‍हाला इंटेलेक्‍चुअल प्रॉपर्टीच्‍या माध्‍यमातून नाविन्‍यता व मूल्‍यनिर्मितीमध्‍ये नव्‍या उंचीवर नेले आहे. दाखल करण्‍यात आलेल्‍या व अनुदान मिळालेल्‍या पेटण्‍ट्सच्‍या विक्रमी आकडेवारीसह आम्‍ही ऑटोमोटिव्‍ह सर्वोत्तमतेला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहोत. आमचे अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, हरित वेईकल्‍स आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांनी आम्‍हाला उद्योगामधील ट्रेलब्‍लेझर म्‍हणून स्‍थापित केले आहे. गतीशीलतेमध्‍ये बदल होत असताना टाटा मोटर्स अग्रस्‍थानी राहण्‍यासोबत सर्वांसाठी स्‍मार्टर, अधिक कनेक्‍टेड भविष्‍याला आकार देत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments