Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती*

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती*

पुणे, दि. २५: जिल्ह्यातील ३४-पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली आहे.

 

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून कमलेश मकवाना यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-२०६ असा आहे. श्री. मकवाना यांचा संपर्क क्रमांक ९६९९१८७७०९ असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सुहास विसपुते यांचा संपर्क क्रमांक ९०११०२७१८७ असा आहे. श्री. मकवाना हे सकाळी १० ते १२ या वेळेत भेटतील, असे पुणे लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments