Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedथोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्मस्थानी अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण रविवारी पुण्यातील थोरले...

थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्मस्थानी अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण रविवारी पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८४ व्या पुण्यतिथीनिमित्त नाशिकमधील डुबेरे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८४ व्या पुण्यतिथीनिमित्त रविवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या जन्मस्थळी नाशिक मधील डुबेरे या गावी करण्यात आले आहे. यावेळी थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी दिली.

 

ज्या बर्वे वाड्यामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म झाला त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. यावेळी लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर,चितळे बंधू मिठाईवालेचे अध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, नवाब शादाब अली पेशवा, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, इतिहास तज्ञ मोहन शेटे उपस्थित राहणार आहेत.

 

कुंदनकुमार साठे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे रणधुरंधर, महापराक्रमी अजिंक्य योद्धा व हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्म स्थळ असलेला डुबेरे ता. सिन्नर येथील “बर्वे वाडा” त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही उभा आहे.

 

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्म स्थानाचा इतिहास ही मोठा रंजक आहे. बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट हे कोकणातील श्रीवर्धन तर आई राधाबाई बर्वे व मामा मल्हारराव बर्वे हे गणपतीपुळ्या जवळच्या नेवरे गावचे. मल्हारराव बर्वे यांनी स्वकर्तृत्वावर नाशिकच्या गंगथंडी प्रांती स्वराज्यकामी केलेल्या कामगिरीबद्दल छत्रपती राजाराम महाराजांकडून त्यांना डुबेरे, पांडुर्ली, पिपळस व कोठुरे ही चार गावे जहागीर (बक्षीस) मिळाली. जहागिरी व चौथाई वसुलीचा कारभार बघण्याकामी त्यांनी डुबेरे येथे कुटुंब कबील्यासाठी हा वाडा बांधला.

 

हिंदू चालीरीती प्रमाणे स्त्रीचे पाहिले बाळंतपण माहेरी व्हावे असा प्रघात आहे. बाजीरावांच्या वेळी राधाबाई बर्वे – पेशवे या सासवड येथे वास्तव्यास होत्या. बाजीरावांचा जन्म पावसाळ्यात भाद्रपद पौर्णिमेचा अशा वेळी बालाजी पंतांनी राधाबाईंना बाळंतपणासाठी दूर पल्ल्याच्या व अती पावसाच्या कोकणातील नेवरे येथे न पाठवता जवळ असलेल्या व तुलनेने सुरक्षित ठिकाणी भावाच्या गावी म्हणजेच डुबेरे येथे पाठवले व म्हणून बाजीरावांचा जन्म डुबेरे येथे मामाच्या घरी बर्वे वाड्यात झाला.

 

सुंदर दीड एकर क्षेत्रात असलेला बर्वे वाडा तीन चौक, एक बुरुज, भक्कम भिंती, कोरीवकाम असलेल्या सागवानी खांबावर उभा असून दरवाजे, पागा, कचेरी असंख्य दालने, धान्याची बलंद, पाण्यासाठी आड इ. सुविधांसह परिपूर्ण असलेला हा “बर्वे वाडा” वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आ

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments