Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedअल्ट्राव्हायलेट तर्फे 'एफ ७७- माग २' इलेकट्रीक मोटरसायकल लाँच

अल्ट्राव्हायलेट तर्फे ‘एफ ७७- माग २’ इलेकट्रीक मोटरसायकल लाँच

पुणे, २६ एप्रिल २०२४— अल्ट्राव्हायलेट या भविष्याचा वेध घेणाऱ्या इलेक्ट्रिक व्हिइकल प्लॅटफॉर्म्स आणि बॅटरी तंत्रज्ञानातील प्रयोगशील कंपनीने आज F77 Mach 2 ही नवी मोटरसायकल सादर केली. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल अत्याधुनिक परफॉर्मन्सची सर्व वैशिष्ट्ये मिळवून देते. अल्ट्राव्हायलेटच्या भविष्यवेधी दृष्टिकोनातून सादर केलेल्या कार्बन फेअरवेल फंड उपक्रमाच्या माध्यमातून F77 Mach 2 साठी २,९९,००० रुपये अशी खास सादरीकरणाची किंमत ठेवण्यात आली आहे. यातून विद्युत वाहनांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

F77 च्या दमदार यशाच्या पार्श्वभूमीवर F77 Mach 2 ही अल्ट्राव्हायलेटच्या परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटरसायकल श्रेणीतील नवे उत्पादन आहे. या मोटरसायकलमध्ये तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्सच्या पातळीवर अनेक नवे आणि अत्याधुनिक बदल करण्यात आले आहेत. परफॉर्मन्सला प्राधान्य देणाऱ्या उत्साही ग्राहकांना बाइक चालवण्याचा नवा आणि अधिक चांगला अनुभव देण्याच्या दृष्टीने या बाइकची रचना करण्यात आली आहे.

 

या क्षेत्रातील सर्वाधिक आणि अतुलनीय अशा ३२३ किमी आयडीसी रेंज या बाइकमध्ये मिळते. याचे श्रेय जाते या उद्योगातील सर्वात दमदार, मोठ्या आणि सर्वात आधुनिक अशा 10.3 kWh बॅटरीला. त्यामुळे अल्ट्राव्हायलेट F77 Mach 2 मध्ये परफॉर्मन्सच्या पातळीवर अनेक नवे मापदंड रचण्यात आले आहेत.

 

अल्ट्राव्हायलेट F77 Mach 2 मध्ये आकर्षक 30 kW (40.2 hp) सह दमदार 100 Nm चा पीक टॉर्क मिळतो. त्यामुळे, इलेक्ट्रिक मोटरसायकल परफॉर्मन्समला नवे आयाम मिळवून दिले आहेत. ही मोटरबाइक अवघ्या २.८ सेकंदांत ० ते ६० किमी/तास असा वेग गाठते आणि १५५ किमी/तास असा सर्वोच्च वेग यात आहे. त्यामुळे ही भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक मोटरसायकल ठरली आहे.

 

अल्ट्राव्हायलेट F77 Mach 2 च्या सादरीकरणानिमित्त अल्ट्राव्हायलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक नारायण सुब्रमण्यम म्हणाले, “अल्ट्राव्हायलेट F77 Mach 2 म्हणजे उत्कृष्ट आणि भविष्यकालीन दळणवळणाचे पर्याय देऊ करण्याच्या आमच्या प्रयत्नांमधली एक महत्त्वाचे पाऊल आहे. मागील दीड वर्षात आमच्या याआधीच्या वाहनासंदर्भात आम्ही गोळा केलेली माहिती आणि आमच्या ग्राहकांसोबत साधलेला संवाद यातून Mach 2 मधील अत्याधुनिक वैशिष्ट्यांची निर्मिती करण्यात आली आहे. आमच्या ग्राहकांना कोणतीही तडजोड न करता उत्कृष्ट अनुभव द्यावा आणि इलेक्ट्रिक दळणवळण साधनांमध्ये नवे मापदंड स्थापित करावेत हे अल्ट्राव्हायलेटचे उद्दिष्ट आहे. अधिक विकसित ३२३ किमी अशा आयडीसी रेंजसह आम्ही F77 Mach 2 या आमच्या पहिल्या उत्पादनातील वैशिष्ट्यांच्या तुलनेत फार पुढे आहोत. या नव्या बाइकमधील आधुनिक आणि आकर्षक वैशिष्ट्यांमुळे चालकांना त्यांच्या मोटरसायकलसह एका नव्या स्वातंत्र्याची अनुभूती घेता येईल.”

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments