Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन*

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन*

 

पुणे, दि. २६: पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मे महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

 

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे २ व ३ मे, मंचर येथे ६ व ७ मे, जुन्नर येथे १५ व १६ मे, वडगाव मावळ येथे २० व २१ मे तर लोणावळा येथे २७ व २८ मे या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments