Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे प्रार्थना समाजाचा चैत्रोत्सव रविवारपासून पुणे प्रार्थना समाज हरीमंदिराच्या ११६ व्या प्रवेश...

पुणे प्रार्थना समाजाचा चैत्रोत्सव रविवारपासून पुणे प्रार्थना समाज हरीमंदिराच्या ११६ व्या प्रवेश दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या हरी मंदिराच्या ११६ व्या प्रवेशदिन ‘चैत्र वद्य षष्ठी’ या दिवसाच्या निमित्ताने चैत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. रविवार दिनांक २८ एप्रिल ते ५ मे या दरम्यान होणाऱ्या चैत्रोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती पुणे प्रार्थना समाजाचे सचिव दिलीप जोग यांनी दिली.

 

बुधवार पेठेतील हरी मंदिरात हे सर्व कार्यक्रम होणार आहेत. रविवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नमिता मुजुमदार यांची उपक्रमोपासना होणार आहे. तर मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता डॉ. सुषमा जोग यांची ईश्वरोपासना होणार आहे.

 

शनिवार दिनांक ४ मे रोजी सकाळी १० वाजता ज्ञान- विज्ञान-तरंग हा विशेष कार्यक्रम तर विज्ञान आणि आध्यात्मिकता हे व्याख्यान होणार आहे. प्रख्यात वैज्ञानिक डॉ. पार्थ घोस यावेळी बोलणार आहेत.

 

उपासना ग्लोबल फोरम यांची नृत्य संगीत उपासना देखील यावेळी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्क व भौतिकी प्राध्यापकचे माजी संचालक दिलीप कान्हेरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. शेवटच्या दिवशी रविवार दिनांक ५ मे रोजी सकाळी १० वाजता रविशंकर बंदा यांची उपासना होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments