Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणेस्थित स्टार्टअप स्टारकेन टेक्नोलॉजिजचा एडीएएस प्रणाली प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार

पुणेस्थित स्टार्टअप स्टारकेन टेक्नोलॉजिजचा एडीएएस प्रणाली प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार

पुणे,29 एप्रिल 2024 : पुणेस्थित डीपटेक स्टार्टअप कंपनी असलेल्या स्टारकेन टेक्नोलॉजिज ने एडीएएस अ‍ॅडव्हान्स्ड ड्राईव्हर असिस्टंस सिस्टिम) प्रणाली प्रदान करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्ससोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर स्टारकेन टेक्नोलॉजिजचे व्यवसाय प्रमुख शशांक जोशी आणि श्री स्वामी समर्थ टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सचे संस्थापक व पुणे बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष किरण देसाई यांनी स्वाक्षर्‍या केल्या.

 

हा सामंजस्य करार पुण्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आला.बस अ‍ॅन्ड कार ऑपरेटर्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे टीपटॉप इंटरनॅशनल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.बंगळुरू येथे आगामी काळात होणार्‍या प्रवासी 4.0 या वाहन उद्योगाविषयक भव्य कार्यक्रमाविषयी झलक दाखविण्यात आली.

 

ब्रेकसेफ (कोलिजन मिटिगेशन सिस्टिम), अटेंशन (ड्रायव्हर मॉनिटरींग सिस्टिम) आणि स्टार्क – आय ( फ्लिट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर) यासारख्या उत्पादनांसह स्टारकेन व्यावसायिक वाहनांसाठी ड्रायव्हिंग सेफ्टी सोल्युशन्स प्रदान करते.ही उत्पादने लेव्हल -2,एडीएएसच्या सर्व गरजा पूर्ण करतात.या उत्पादनांची निर्मिती नवी मुंबईतील तुर्भे येथे होत असून असेंम्ब्ली औंध येथे केली जाते.आजवर स्टारकेन ने 2500 हून अधिक वाहनांमध्ये हे सेफ्टी सोल्युशन्स बसविले आहेत.

 

स्टारकेन टेक्नोलॉजिज प्रा.लि.चे व्यवसाय प्रमुख शशांक जोशी म्हणाले की,या भागीदारीमुळे श्री स्वामी समर्थ टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सच्या वाहनांच्या ताफ्याला फायदा होणार असून यामुळे चालक आणि प्रवाशांसाठी सुरक्षित ड्राइव्हिंग इको सिस्टिम स्थापित होण्यास मदत होईल.तसेच स्टारकेनला एडीएएस आणि फ्लिट मॅनेजमेंटबाबत जागरूकता वाढविता येईल व संपूर्ण वाहन उद्योगात आणि ओईएममध्ये विश्‍वास संपादन करण्यास मदत होईल.

 

भारतात एडीएएस प्रणाली स्विकारण्याबाबत असलेल्या प्रमुख आव्हानांमध्ये याला लागणारा खर्च,प्रशिक्षण आणि वाहनाशी अनुकूलता ही आहेत.या सर्व समस्या जाणून घेऊन आम्ही आपल्या देशासाठी सुयोग्य असे मेड इन इंडिया उत्पादने आणली आहेत.

 

अधिक माहितीसाठी https://www.starkenn.com या संकेतस्थळाला भेट द्या.

 

(सीएमआय मार्केट रिसर्चच्या अहवालानुसार भारतातील एडीएएस बाजारपेठ ही 2023 पासून 2032 पर्यंत वर्षागणिक 18.80 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. 2022 मध्ये 1.24 अब्ज युएस डॉलर वरून ही बाजारपेठ 2032 मध्ये 9.98 अब्ज डॉलरपर्यंत पोहचण्याचा अं

दाज आहे.)

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments