Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमावळचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांची माध्यम कक्षाला भेट

मावळचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांची माध्यम कक्षाला भेट

पुणे, दि. २९: मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने स्थापन माध्यम संनियंत्रण व जनसंपर्क कक्षाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत श्री. राजशेखर यांनी समाधान व्यक्त केले.

निवडणूक निरीक्षक श्री.राजशेखर यांनी विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली.

माध्यम कक्षात सुमारे १० दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

निवडणूक निरीक्षकांनी सीव्हिजील कक्षालाही भेट देऊन नागरिकांच्या तक्ररी संदर्भात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments