Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोनिगरा विहार – काळेवाडी मतदार जनजागृती अभियान

सोनिगरा विहार – काळेवाडी मतदार जनजागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दीपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली सोनिगरा विहार, काळेवाडी येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

 

सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी सोनिगरा विहार सोसायटीमधील नागरिक,ज्येष्ठ नागरिक, सुरक्षा रक्षक, मुले, २०५ चिंचवड विधानसभा मतदार स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित होते. तसेच सोनिगरा विहार सोसायटीचे श्री.श्याम पाटील, श्री.सुरेश चपळगावकर, श्री.प्रफुल्ल पटेल यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली.

 

मा.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये या भागातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यामध्ये “मतदान तुमचा अधिकार आहे , मतदान करायचे आहे आपले कर्तव्य बजावयाचे आहे.” अशा घोषणा देण्यात आला. यानंतर नागरिकांकडून मतदान प्रतिज्ञा म्हणून घेणेत आली

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments