Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रीव्‍ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून उच्‍च-कार्यक्षम फॅमिली इलेक्ट्रिक स्‍कूटर 'एम्पेयर नेक्‍सस' सादर

ग्रीव्‍ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून उच्‍च-कार्यक्षम फॅमिली इलेक्ट्रिक स्‍कूटर ‘एम्पेयर नेक्‍सस’ सादर

नवी दिल्ली, एप्रिल ३०, २०२४: ग्रीव्‍ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्‍हेट लिमिटेड (जीईएमपीएल) या ग्रीव्‍ह्ज कॉटन लिमिटेडच्‍या ई-मोबिलिटी शाखेने आज 1,09,900 रूपये (एक्‍स-शोरूम) या सुरूवातीच्‍या किमतीत पहिली उच्‍च-कार्यक्षम फॅमिली इलेक्ट्रिक स्‍कूटर ‘एम्पेयर नेक्‍सस’ लाँच केली आहे. एम्पेयर नेक्‍सस पूर्णत: भारतात डिझाइन, विकसित व उत्‍पादित करण्‍यात आली आहे आणि या वेईकलमध्‍ये विविध नाविन्‍यपूर्ण व दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये आहेत.

 

एम्पेयर नेक्‍सस चार आकर्षक रंगांमध्‍ये येते: झंस्‍कार अॅक्‍वा, इंडियन रेड, लुनार व्‍हाइट आणि स्‍टील ग्रे. या वैविध्‍यपूर्ण कलर पॅलेटमधून राइडर्सना त्‍यांच्‍या पसंतींनुसार विविध लक्षवेधक निवडींची खात्री मिळते. उच्‍च-कार्यक्षम व फॅमिली-केंद्रित वैशिष्‍ट्ये इलेक्ट्रिक स्‍कूटर अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जातात, अद्वितीय आरामदायीपणा, स्‍टाइल, कार्यक्षता, इंटेलिजन्‍स आणि सुरक्षितता देतात.

 

– बेस्‍ट-इन-क्‍लास हायब्रिड स्विंग आर्मसह ट्विन सस्‍पेंशन

 

– बेस्‍ट-इन-क्‍लास ऐरोडायनॅमिक्‍ससह अद्वितीय एअर-कूल आर्किटेक्‍चर

 

– ४ पट शक्तिशाली चेसिस, तसेच Nex.Armor™ सह सक्षम लोड-स्‍ट्रॅटिफाईड डिझाइन

 

– नट्स व बोल्‍ट्स न दिसणारी फर्स्‍ट-टू-मार्केट प्रीमियम सीमलेस डिझाइन

 

– ७ इंच टीएफटी टचस्क्रिनसह स्‍मार्टसेन्‍स तंत्रज्ञान आणि Nex.IO™ सह सक्षम अत्‍यंत गतीशील बूट टाइम

 

– सर्वात सुरक्षित एलएफपी केमिस्‍ट्रीसह १.३ पट अधिक सायकल लाइफ आणि ३ तास २२ मिनिटांची सर्वात गतीशील चार्जिंग वेळ

 

– श्रेणीमधील सर्वात प्रखर डायमंड कट हेडलॅम्‍प्‍स आणि आर्क्टिक टर्म-इन्‍स्‍पायर्ड टेललॅम्‍प्‍स

 

– कार्यक्षमपणे डिझाइन केलेली मोठी सीट, तसेच वजनाने हलके अॅल्‍युमिनिअम ग्रॅब हँडल

 

– प्रतितास ९३ किमीच्‍या अव्‍वल गतीसह पाच राइडिंग मोड्स आणि १३६ किमीची प्रमाणित रेंज

 

– नट्स व बोल्‍ट्स न दिसणारी प्रीमियम सीमलेस डिझाइन

 

ग्रीव्‍ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्‍हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. के. विजय कुमार म्‍हणाले, “एम्पेयर नेक्सस हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणे ही शाश्वत वाहतुकीच्या आमच्या वचनबद्धतेतील एक महत्त्वपूर्ण यश आहे. आरामात शहरी ते हाय-स्पीड मॉडेल्सकडे हे संक्रमण आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. ई-गतिशीलतेचे लोकशाहीकरण करण्याच्या प्रत्येक प्रगतीसह, आम्ही अधिक समावेशक, शाश्वत भविष्याकडे प्रगती करतो. त्यांच्या दैनंदिन आकांक्षांची जबाबदारी घेण्यास तयार असलेल्यांसाठी अँपिअर नेक्सस तयार आहे.”

 

३ केडब्‍ल्‍यूएच सर्वात सुरक्षित एलएफपी बॅटरीसह ३० टक्‍के अतिरिक्‍त बॅटरी लाइफ आणि शक्तिशाली मिड-माऊंट ड्राइव्‍ह असलेली ही ई-स्‍कूटर ४ केडब्‍ल्‍यू पीक मोटर शक्‍तीच्‍या माध्‍यमातून एकसंधी राइडिंग अनुभव देते. पाच वैविध्‍यपूर्ण राइडिंग मोड्स, फ्रण्‍ट डिस्‍क ब्रेक्‍स आणि आयपी६७ रेटिंगसह राइडर्स सर्व प्रदेश व हवामानांसह पाणी साचलेल्‍या भागांमधून सहजपणे नेव्हिगेट करू शकतात, जे या स्‍कूटरने लाँच होण्‍यापूर्वी काश्‍मीर ते कन्‍याकुमारीपर्यंत पार केलेल्‍या १०,००० किमी अंतरावरून सत्‍यापित होते. एम्पेयर नेक्‍सस पॉवर मोडमध्‍ये प्रभावी गती देत परफॉर्मन्‍स व कार्यक्षमतेची खात्री देते, तसेच अधिक आरामदायी-केंद्रित मल्‍टीपल सिटी मोड्स व रिव्‍हर्स मोड देखील आहे. प्रतिचार्ज १३६ किमीच्‍या उल्‍लेखनीय सीएमव्‍हीआर-प्रमाणित रेंजसह राइडर्स वारंवार बॅटरी रिचार्ज करण्‍याबाबत चिंता न करता एक्‍स्‍लोरचा अधिकाधिक आनंद घेऊ शकतात. नाविन्‍यता व विश्‍वसनीयतेसह डिझाइन करण्‍ण्‍यात आलेली एम्पेयर नेक्‍सस इलेक्ट्रिक गतीशीलतेसाठी नवीन बेंचमार्क स्‍थापित करते, ज्‍यामधून Nex.Armor आणि Nex.IO च्‍या ट्रेडमार्क तंत्रज्ञानांचे तत्त्व दिसून येते.

 

द नेक्‍स बिग थिंग प्रमाणेच या ई-स्‍कूटरने काश्‍मीर ते कन्‍याकुमारीपर्यंत विक्रमी प्रवास केला. या मोहिमेने चार प्रतिष्ठित विक्रम स्‍थापित केले, ज्‍याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून मान्‍यता मिळाली. या ई-स्‍कूटरने एकाच प्रवासात १०,००० किलोमीटरहून अधिक अंतर कापत सर्वात लांब इलेक्ट्रिक स्‍कूटर राइडची नोंद केली. या प्रवासाने एकाच राइडमध्‍ये ११५ शहरे व नगरांना भेट देत विक्रम रचला. तसेच, दोन प्रवाशांच्‍या १४० किग्रॅ वजनासह १८६० किग्रॅ वजन असलेल्‍या पिकअप ट्रकला २ किलोमीटर अंतरापर्यंत टोईंग करणारी ही पहिली इलेक्ट्रिक स्‍कूटर ठरली. आणखी एक उल्‍लेखनीय यश म्‍हणजे पांढऱ्या वाळूवर सर्वात मोठे इलेक्ट्रिक स्‍कूटर ब्रँड लोगो तयार करण्‍यात आले, ज्‍याचे मापन १७९.८ फूट x ९५.२ फूट म्‍हणजेच १७१०० चौरस फूट होते.

 

आज, एम्पेयर नेक्‍सस ऑनलाइन दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये (नेक्‍सस ईएक्‍स आणि नेक्‍सस एसटी) बुक करता येऊ शकते. मे २०२४ च्‍या उत्तरार्धापासून भारतभरातील ४०० हून अधिक डिलरशिप्‍स व टचपॉइण्‍ट्समध्‍ये टेस्‍ट राइड्स व डिलिव्हरी उपलब्‍ध असतील.

 

तुमची नेक्‍सस आजच बुक करा – Link

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments