Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedविजय सेल्स – रहाटणी मतदार जनजागृती अभियान

विजय सेल्स – रहाटणी मतदार जनजागृती अभियान

 

 

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दिपक सींगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली विजय सेल्स, रहाटणी येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

 

सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी विजय सेल्सचे मॅनेजर श्री. दशरथ चौगले, श्री.विभिषण पवार, श्री.संदेश राठोड, श्रीम.श्रध्दा रामू बाके आणि तेथील कर्मचारी व २०५ चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टीमचे कर्मचारी यावेळी येथे उपस्थित होते. मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये विजय सेल्समधील कर्मचा-यांना व ग्राहकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली. यामध्ये कर्मचा-यांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला तसेच ‘हातभर तक्रारी, बोटभर उपाय’, ‘आपले मत आपला हक्क, चला मतदान करूया’, असा संदेश देण्यात आला. यानंतर कर्मचा-यांकडून मतदान प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आ

ली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments