Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedहडपसर विधानसभा मतदारसंघातील टपाली मतदानाचे वेळापत्रक जाहीर*

हडपसर विधानसभा मतदारसंघातील टपाली मतदानाचे वेळापत्रक जाहीर*

 

 

पुणे.दि.१:- शिरुर लोकसभा मतदारसंघांतर्गत हडपसर विधानसभा मतदारसंघातील ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्रे स्थापन करून तेथे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हडपसर विधानसभा मतदार संघातील या मतदानाचे वेळापत्रक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांनी जाहीर केले आहे.

 

हडपसर विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया ५ ते ७ मे २०२४, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) ७ ते ९ मे तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) १० ते १२ मे दरम्यान नोंदवून घेण्यात येणार आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments