Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedअंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दीपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिप वाटण्यात आल्या.

 

२०५ चिंचवड विधानसभा अंतर्गत दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात आलेला असून, सदर कक्षाच्या वतीने दिव्यांग मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीत मतदार व्होटर स्लिपचे वाटप करण्यात येवून मतदानाचे कर्तव्य बजाविण्याकरिता प्रोत्साहित करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments