पिंपरी, दि. २ मे २०२४ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीता, राज्यगीतानंतर मतदान शपथ घेण्यात आली.
आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत अधिकारी,कर्मचारी यांनी “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाही निष्ठा ठेवून, मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज किंवा भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू” अशी शपथ घेत १०० टक्के मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचा निर्धार केला.
आयुक्त सिंह यांनी शहरवासियांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर,उप आयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, रविकिरण घोडके, अण्णा बोदडे,निलेश बधाने, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, पंकज पाटील, तानाजी नरळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, क्रिडा अधिकारी अनिता केदारी तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व मतदान शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर किरण गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.


