Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedसरसेनापती हंबीरराव मोहिते जयंतीनिमित्त धान्य आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप मोहिते स्वराज्य घराण्याच्या...

सरसेनापती हंबीरराव मोहिते जयंतीनिमित्त धान्य आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप मोहिते स्वराज्य घराण्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : मराठा साम्राज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कार्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राशीनमधील संकल्प वसतिगृहातील अनाथ मुलांना धान्य आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

मोहिते स्वराज्यघराण्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत सोनवणे, शाहिर हिंगे लोककला प्रबोधिनीचे शाहीर हेमंतराजे मावळे, शिवजयंती महोत्सव समितीचे अमित गायकवाड, शिरीष मोहिते, अविनाश मोहिते, अॅड. प्रशांत मोहिते अविनाश मोहिते, दत्तात्रय मोहिते, संदीप मोहिते, विक्रांत मोहिते, रोहन मोहिते, सागर मोहिते, विजय मोहिते, रुपेश मोहिते, राहुल मोहिते यावेळी उपस्थित होते.

 

शाहीर हेमंत मावळे म्हणाले, स्वराज्य घराण्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या चांगल्या गोष्टींचे स्मरण करुन त्यांचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी समाजोपयोगी कार्य सुरु ठेवावेत. पाश्चात्यांचे अनुकरण करण्यापेक्षा आपण आपल्या पराक्रमी पूर्वजांचे अनुकरण करु. असेही त्यांनी सांगितले.

 

अमित गायकवाड म्हणाले, शिवरायांच्या काळात निर्माण झालेली सर्व स्वराज्य घराणी विखुरलेल्या अवस्थेत होती. परंतु शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे आयोजित शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने सर्व स्वराज्यघराणी आता एकत्र येत आहेत. स्वराज्य कार्य पुढे नेण्यासाठी एकजुटीने काम करुया असेही त्यांनी सांगितले.

 

शिरीष मोहिते म्हणाले, हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा सैन्याच्या सेनापतींचे प्रतिष्ठित पद भूषविले होते. ते त्यांच्या अतुलनीय पराक्रमासाठी ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हंबीरराव ही पदवी दिली होती. त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न विविध सामाजिक कार्यातून आम्ही करत आहोत. विक्रांत मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश मोहिते यांनी आभार मानले

.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments