Saturday, October 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यामध्ये अनस्क्रिप्टेड कॉर्न्व्हसेशन्सचे आयोजन

पुण्यामध्ये अनस्क्रिप्टेड कॉर्न्व्हसेशन्सचे आयोजन

पुणे,9 मे 2024 : पुण्यात द हयात हॉटेल येथे शनिवार,11 मे 2024 रोजी अनस्क्रिप्टेड कॉर्न्व्हसेशन्स अनोख्या टॉक शो चे आयोजन करण्यात आले आहे. इंडस इंटरनॅशनल स्कुल पुणे आणि अनस्क्रिप्टेड कॉर्न्व्हसेशन्स.इन च्या सहकार्याने आयोजित या ज्ञानवर्धक कार्यक्रमाची संकल्पना यश एक उत्क्रांती ही आहे. ना नफा तत्त्वावर असणार्‍या या टॉक शो मध्ये विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील अनुभव आणि दृष्टीकोन सादर करतील.

 

कार्यक्रमामध्ये सहभागी होणार्‍या नामवंत व्यक्तींमध्ये इंडस ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक लेफ्टनंट जनरल अर्जुन रे, दिग्दर्शक व निर्माता गुरमीत सिंग,वेस्टसाईडचे मुख्य कामकाज अधिकारी शालिना परती, अभिनेता व वॉईस आर्टिस्ट विजय विक्रम सिंग,स्पायकर जीन्सचे संस्थापक संजय वखारिया,बाला सिनोरच्या अलिया सुलताना बाबी, प्रख्यात वाईन व फूड एक्सपर्ट शगुन अग्रवाल मेहरा,आधुनिक संग्रहालयाच्या डिझायनर वंदना राज,द समर हाऊसच्या संस्थापिका शिवांगिनी पदियार यांचा समावेश आहे.या चर्चासत्रांचे समन्वयन अनस्क्रिप्टेड कॉर्न्व्हसेशन्स.इन चे संस्थापक सदस्य आनंद पटेल हे करणार आहेत.

 

हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता सुरु होणार असून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 7506660600 या क्रमांकावर संपर्क साधावा

.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments