महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या निवद्णूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, आणि काँटेंमेंट अशा पाच विधानसभा मतदार संघामध्ये स्वतंत्र दुचाकी रॅलींचे आयोजन करण्यात आले. यामध्ये काँग्रेस बरोबरच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले झेंडे डौलाने फडकत होते. विविध घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दुचाकींसह रॅलीमध्ये सहभागी झाले असले तरी रस्त्यावरील वाहतुकीला अडसर होऊ नये म्हणून शिस्तीने एका बाजूने रांगेने जात होते. या पाचही विधानसभा मतदार संघातील रॅलींचे ठिकठिकाणी जंगी स्वागत केले गेले. रस्त्यावरील नागरिक देखील या रॅलीतील कार्यकर्त्यांना हात हलवून प्रतिसाद देत होते. उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी या विविध रॅलींमध्ये सहभागी होऊन मतदारांशी संवाद साधला. या विविध मतदार संघातील रॅलींमध्ये विविध ठिकाणी सुप्रिया सुळे, डॉ. विश्वजीत कदम माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, सौ. प्रतिभा धंगेकर धैर्यशील मोहिते पाटील, अभय छाजेड, आबा बागुल, विशाल धनवडे, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, अजित दरेकर, दत्ता बहिरट, मनीष आनंद, पूजा आनंद, रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, पृथ्वीराज सुतार, चंद्रकांत मोकाटे, गजानन थरकुडे, संजय मोरे यांसह विविध मतदार संघात अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


