Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedविविध उपक्रमांसह टीजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा

विविध उपक्रमांसह टीजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा

तळेगाव- परिचारिकांच्या योगदानाचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आज (12 मे) आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने तळेगाव येथील टीजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून परिचारीकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी रूग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक श्री . सचिन देशमुख, ग्रुप स्ट्रॅटेजी अँड बिजनेस डेव्हलपमेंट हेड डाँ.संतोष साहू, डाँ.अभिषेक पुरकायस्थ,डाँ.विश्वास कौल, डाँ.मृणाल परब, डाँ.ज्योती मेहता, डाँ. अमोल मदने, डाँ.संगीता पाटील तसेच रूग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 

टीजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे आंतरराष्ट्रीय परिचारीका दिनानिमित्त प्रश्नमंजुषा, पोस्टर मेकींग, बेस्ट ड्रेस स्पर्धा, बेस्ट वर्कर ऑफ द मंथ, मनोरंजनात्मक खेळ,रांगोळी स्पर्धेसह केक कापून हा दिवस साजरा करण्यात आला. परिचारिकांची सेवा हा वैद्यकीय क्षेत्राचा मुख्य कणा आहे. दुर्धर आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची सेवा करण्यास वेळप्रसंगी कुटूंबातील सदस्य देखिल हतबल होतात. अशावेळी त्यांचा पुर्ण विश्वास परिचारिकांच्या सेवेवर असतो.

 

परिचारिका या वेळप्रसंगी आपल्या स्वता:च्या व कुटूंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन जीवावर उदार होऊन रुग्णाची सेवा सुश्रूषा करतात. परिचारिकांच्या माध्यमातून रुग्णांची चांगली काळजी घेतली जाते आणि त्यांचे प्रशिक्षण, अनुभव जीव वाचवण्यासाठी आणि लोकांना निरोगी बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. रुग्णांची काळजी घेण्यासाठी त्या नेहमीच आपले सर्वस्व पणाला लावतात, अशी प्रतिक्रिया ऑन्को लाईफ हॉस्पिटल्सचे अध्यक्ष श्री उदय देशमुख यांनी व्यक्त के

ली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments