पुणे, दि. 15 मे २०२४ : अमेरिकन लेखिका देना मरियम यांच्या मूळ इंग्रजीतील ‘सीतायन’ चा कविता गुप्ता यांनी केलेल्या हिंदी अनुवादित ‘माता सीता की अनकही कथा’ या कादंबरीचे नुकतेच प्रकाशन संपन्न करण्यात आले. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोशाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. दिल्ली येथील मोतीलाल बनारसीदास पब्लिशिंग हाऊस आणि श्री व्यंकटेश ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रकाशक वरूण जैन तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते सुनिल देवधर, तसेच आयोजक व सूत्रसंचालक मुकुंद हिरवे उपस्थित होते.
यापूर्वी देना मरियम यांच्या मूळ इंग्रजी ‘सीतायन’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद पुणेकर अभ्यासक शशिकांत जोशी यांनी पाच वर्षांपूर्वी केला असून त्याची दुसरी आवृतीही लवकरच प्रकाशित होत आहे.
ईश्वरी हिरवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता प्रणव देवधर यांच्या पसायदानाने झाली.


