Tuesday, October 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedअमिटी युनिव्हर्सिटी राजस्थानचा नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी (यूके) सोबत सामंजस्य करार

अमिटी युनिव्हर्सिटी राजस्थानचा नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी (यूके) सोबत सामंजस्य करार

पुणे,१५ मे 2024 : अमिटी युनिव्हर्सिटी राजस्थान तर्फे डिझायनिंग अँड डेव्हलपिंग एक्सप्लेनेबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड टूल्स फॉर अर्ली डिटेक्शन अँड मॅनेजमेंट ऑफ डिमेंशिया या विषयावर को-डिझाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी (यूके) द्वारे निधी प्राप्त झाला असून आणि डीएसटी पर्स द्वारे समर्थन मिळाले होते. या कार्यक्रमात अमिटी कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग अँड ब्रेन इन्फॉर्मेटिक्स सेंटर ( एसीसीबीआय) चे अधिकृत उद्घाटन देखील करण्यात आले, ही एक अत्याधुनिक सुविधा आहे जी कॉग्नेटिव्ह कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ब्रेन इन्फॉर्मेटिक्स मधील संशोधनाला समर्पित आहे.याबरोबरच याप्रसंगी कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग अँड ब्रेन इन्फॉर्मेटिक्स (सीसीबीआय) या नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी (यूके) च्या या रिसर्च ग्रुप ने अमिटी कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग अँड ब्रेन इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एसीसीबीआय) शी सामंजस्य करार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments