Tuesday, October 6, 2026
Google search engine
HomeUncategorized‘डीजेएसआय’कडून सर्वोच्च मानांकन प्राप्त करीत ‘क्रॉम्प्टन’ने शाश्वत ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या क्षेत्रात मिळविली...

‘डीजेएसआय’कडून सर्वोच्च मानांकन प्राप्त करीत ‘क्रॉम्प्टन’ने शाश्वत ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या क्षेत्रात मिळविली आघाडी

मुंबई, १३ मे २०२४ : ऊर्जाबचत करणाऱ्या व शाश्वत ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या आपल्या विस्तृत श्रेणीसाठी वाखाणल्या जाणाऱ्या क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लि. या कंपनीने पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय (ईएसजी) क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समध्ये (डीजेएसआय) उच्च स्थान प्राप्त केले आहे. ‘क्रॉम्प्टन’ला जागतिक टक्केवारीत ९४वे स्थान मिळाले असून ‘डीएचपी हाउसहोल्ड ड्युरेबल्स’ क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्ये ७वे स्थान मिळाले आहे. ‘क्रॉम्प्टन’ची शाश्वत कार्यपद्धतींप्रतीची समर्पितता आणि उद्योगक्षेत्राच्या नेतृत्वपदी कंपनीचे स्थान अधिक ठळकपणे अधोरेखित करणारे हे यश आहे.

१९९९ साली स्थापन झालेला ‘डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स’ हा जगभरातील हजारो कंपन्यांच्या शाश्वततेच्या आघाडीवरील कामगिरीचे मूल्यमापन करणारा एक मापदंड आहे. ‘डीजेएसआय’च्या कठोर मूल्यमापन प्रक्रियेमध्ये कंपन्यांचे आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक निकषांवर परीक्षण केले जाते व त्यात दीर्घकालीन शाश्वततेवर भर दिला जातो. उदाहरणार्थ, या ‘डीजेएसआय वर्ल्ड’द्वारे ‘एस अॅंड पी ग्लोबल ब्रॉड मार्केट इंडेक्स’मधील सर्वात मोठ्या २५०० कंपन्यांमधील सर्वोत्तम १० टक्‍के कंपन्यांची त्यांच्या दीर्घकालीन ‘ईएसजीच्या’ निकषांनुसार दखल घेतली जाते.

‘क्रॉम्प्टन’ने यावर्षी ‘डीजेएसआय’मध्ये मिळविलेल्या गुणांमधून कंपनीने महत्त्वाच्या क्षेत्रांतील मिळविलेल्या गुणांकनातील सुधारणा दिसून येते. यामध्ये पर्यावरणीय शाश्वतता, उत्पादनाच्या आघाडीवरील धुरिणत्व, समाजावर मोठा प्रभाव टाकणारे सामाजिक जबाबदारीचे उपक्रम, वैविध्य, कर्मचाऱ्यांचे स्वास्थ, मनुष्यबळ विकास आणि भक्कम प्रशासकीय कार्यपद्धती यांचा समावेश आहे. शाश्वत विकासाच्या वाटेवरून कंपनीचा प्रवास पुढे सुरू असतानाच सातत्याने सुधारणा आणि नवसंकल्पना राबविण्याप्रती आपली बांधिलकीही कंपनी खंबीरपणे जपत आहे आणि जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व सकारात्मक बदलांना चालना देण्यासाठी नव्या संधींचा शोध घेत आहे.

या यशाबद्दल आपले मत व्यक्त करताना क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोमीत घोष म्हणाले, “क्रॉम्प्टनमध्ये आमच्या प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी शाश्वततेचे मूल्य असते. म्हणूनच आम्ही ऊर्जाबचतीचे मूलभूत उद्दिष्ट असलेली उत्पादने डिझाइन करतो व उत्पादित करतो. कंपनीचे मानचिन्ह म्हणता येतील अशा आमच्या पंख्यांपासून ते टिकाऊ एलईडी दिव्यांपर्यंत ‘क्रॉम्प्टन’ची उत्पादने ग्राहकांना विजेचा कमीत-कमी वापर करण्यासाठी आणि पर्यावरणावर आपला कमीतकमी ठसा उमटावा, यासाठी प्रयत्न करण्यास सक्षम बनवितात. आमच्या उत्पादनांची शाश्वतता अधिक वाढविण्यासाठी आम्ही सतत नव्या तंत्रज्ञानांचा आणि सामग्रीचा शोध घेत असतो; ‘क्रॉम्प्टन’च्या प्रत्येक उत्पादनाने ग्राहकांना त्यांच्या घरांसाठी व या वसुंधरेसाठी जबाबदारीने निवड करण्यास सक्षम बनवावे, अशी आमची अपेक्षा असते. शाश्वत कार्यपद्धती या केवळ या पृथ्वीसाठीच नव्हे तर आमच्या व्यवसायासाठी व आमच्या ग्राहकांसाठीही चांगल्या आहेत असा आमचा विश्वास आहे. या यशामुळे आम्ही पूर्णत: भारावून गेलो आहोत आणि एका अधिक शाश्वत भविष्याच्या सामायिक पाठपुराव्यामध्ये आमचे कर्मचारी, ग्राहक व व्यावसायिक भागीदार यांना सहभागी करून घेण्याप्रती कटिबद्ध आहोत.”

‘क्रॉम्प्टन’विषयी :

८५ वर्षांचा प्रदीर्घ असा ब्रॅण्डचा वारसा लाभलेली क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लिमिटेड ही फॅन्स (पंखे) व निवासी पंपांच्या विभागातील भारतीय बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे. गेल्या अनेक वर्षांत कंपनीने आधुनिक ग्राहकाच्या गरजा पूर्ण करणारी अनेकविध नाविन्‍यपूर्ण उत्पादने देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यामध्ये श्रेष्ठ दर्जाचे व उच्‍च कामगिरी करणारे पंखे, पंप, लाईटिंग सोल्यूशन्स, वॉटर हीटर्स, एअर कूलर्स, तसेच एअर फ्रायर्स, ओटीजी, इलेक्ट्रिक केट्ल्स मिक्‍सर ग्राइंडर्स यांसारखे लहान किचन अप्‍लायन्‍सेस, इस्‍त्रीसारखी होम अप्‍लायन्‍सेस आणि बिल्‍ट-इन किचन अप्‍लायन्‍सेस अशा अनेकविध श्रेणींचा समावेश होतो. कंपनीने ब्रॅण्ड आणि नाविन्‍यपूर्ण संशोधनामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतात व त्या पूर्ण करतात येतातच, शिवाय ऊर्जा कार्यक्षमतेलाही चालना देण्यात मदत होते. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यवसायाला आवश्यक असे सुस्थापित आणि संघटित वितरण नेटवर्कही कंपनीने विकसित केले आहे. देशभरातील वितरकांच्या भक्‍कम नेटवर्कच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा पुरवली जाते तसेच विक्रीपश्‍चात्त सेवाही कार्यक्षमतेने दिल्या जातात.

ऊर्जा-कार्यक्षम उत्‍पादनांचा विकास करण्‍यावर कंपनीने नेहमीच भर दिला आहे. त्यामुळे कंपनीला नावलौकिक मिळाला आहेच, त्याशिवाय या प्रयत्‍नांसाठी अनेक मान्‍यता व पुरस्‍कारही मिळाले आहेत. कंपनीला ऊर्जा मंत्रालयाच्‍या ‘ब्‍युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्‍सी’द्वारे तीन प्रतिष्ठेची नॅशनल एनर्जी कंझ्युमर अवॉर्डस् (एनईसीए) प्राप्‍त झाली आहेत. २०२३ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्‍या हस्‍ते कंपनीच्या स्टोरेज वॉटर हीटर या उत्पादनाचा एका पुरस्काराद्वारे खास गौरव करण्यात आला. २०१९ मध्ये या ब्रॅण्‍डने सीलिंग फॅन आणि एलईडी बल्ब या दोन श्रेणींमध्ये चांगले यश मिळवले. याव्यतिरिक्त २०२२ मध्ये, डेलॉइट प्रायव्हेटने क्रॉम्प्टन कंपनीला ‘इंडियाज बेस्‍ट मॅनेज्‍ड कंपनी’ म्‍हणून गौरविले. डन अॅण्‍ड ब्रॅडस्‍ट्रीट इंडियाने ‘इंडियाज टॉप ५०० कंपनीज २०२२’ या आपल्या यादीत क्रॉम्प्टनला स्थान दिले आहे. डब्ल्यूपीपी आणि कंतार यांनी २०२० साली प्रसिद्ध केलेल्या ‘आघाडीच्या सर्वांत मौल्यवान ७५ भारतीय ब्रॅण्ड्स’च्या यादीतही कंपनीला स्थान देण्यात आले. याशिवाय हेराल्ड ग्लोबल अॅंड बीएआरसी आशिया या संस्थेने ग्राहकोपयोगी इलेक्ट्रिकल वस्तूंच्या विभागात ‘क्रॉम्प्टन’चा ‘ब्रॅण्ड ऑफ द डिकेड २०२१’ म्हणून सन्मान केला आहे.

 

 

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments