कोल्हापूर, 18 मे 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित 19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अरींजय पाटील, वरद उंद्रे, सय्यम पाटील, नीरज जोर्वेकर यांनी तर, मुलींच्या गटात काव्या देशमुख, आर्या शिंदे, श्रीमोयी कामत, मेह्क कपूर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सलामी दिली.
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या पात्रता फेरीत कोल्हापूरच्या अरींजय पाटील याने आरुश जोशीचा 6-4, 6-3 असा तर, पुण्याच्या वरद उंद्रेने आरव गुप्ताचा 6-1, 6-4 असा पराभव केला. सय्यम पाटीलने सतीश अनुरागचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणले. नीरज जोर्वेकर याने ईश्वरराज होमीकरचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला.
मुलींच्या गटात दुसऱ्या पात्रता फेरीत अव्वल मानांकित काव्या देशमुखने अनन्या यादवचा 6-3, 6-0 असा तर, तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या श्रीमोयी कामत हिने तेलंगणाच्या हर्षिनी कोंडराजूचा 6-1, 6-0 असा पराभव करून पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला. बाराव्या मानांकित आर्या शिंदे हिने रितू ग्यानचा टायब्रेकमध्ये 7-6(1), 6-2 असा पराभव करून अंतिम पात्रता फेरी गाठली.
सविस्तर निकाल: मुले: पहिली पात्रता फेरी:
सिद्धांत वोडीयार(कर्नाटक)वि.वि.अमोघ हिरेमठ(महा) 6-0, 6-3;
ड्रितन पिलारिसेट्टी वि.वि.ओम कलशेट्टी ६-४, ६-२;
अरींजय पाटील (महा)वि.वि.आरुश जोशी (महा) 6-4, 6-3;
वरद उंद्रे(महा)वि.वि.आरव गुप्ता(महा) 6-1, 6-4;
सय्यम पाटील(महा)वि.वि.सतीश अनुराग(महा) 6-4, 6-3;
यश पटेल (गुजरात)वि.वि.कृष्णा राणी(महा) 6-0, 6-0;
वीरेन सूर्यवंशी(महा) वि.वि.अझलन शेख(महा) 6-1, 6-2;
आदित्य गायकवाड(महा)वि.वि.रतन कुबासद(कर्नाटक) 6-2, 7-5;
शिवराज जाधव(महा)वि.वि.अमोघ पाटील(महा) 6-2, 6-1;
नीरज जोर्वेकर(महा)वि.वि.ईश्वरराज होमीकर 6-0, 6-0;
मुली: दुसरी पात्रता फेरी:
काव्या देशमुख(महा)(1)वि.वि.अनन्या यादव(महा) 6-3, 6-0;
अव्यक्ता रायावरपू(तेलंगणा)(2)वि.वि.जान्हवी चौगुले(महा) 6-1, 6-1;
आर्या शिंदे(महा)(12)वि.वि.रितू ग्यान 7-6(1), 6-2;
श्रीमोयी कामत(महा)(3)वि.वि. हर्षिनी कोंडराजू(तेलंगणा) 6-1, 6-0;
मेहक कपूर(महा)(5)वि.वि.प्रांजली पांडुरे 6-0, 6-0;
किथना रंगिनेनी(तेलंगणा)(4)वि.वि.आरोही
देशमुख(महा) 6-3, 1-6, 12-10;


